12 December 2024 5:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज 15 जुलै रोजी तुनवाल ई-मोटर्स लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीच्या IPO चा आकार 115.64 कोटी रुपये आहे. तुनवाल ई-मोटर्स लिमिटेड ही कंपनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीचा प्लांट पलसाणा येथे आहे. या प्लांटची उत्पादन क्षमता 41 हजार युनिट्स आहे. ( तुनवाल ई-मोटर्स लिमिटेड कंपनी अंश )

ही कंपनी उच्च दर्जाच्या इलेक्ट्रिक दुचाकींचे डिझाइन, विकास, उत्पादन आणि वितरण या कामात एक्स्पर्ट मानली जाते. आपल्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तुनवाल ई-मोटर्स लिमिटेड कंपनीने स्थानिक बाजारपेठेत 23 पेक्षा जास्त मॉडेल्स लाँच केले आहेत. या कंपनीकडे 19 राज्यांमध्ये 256 पेक्षा जास्त डीलर्सचे नेटवर्क आहे. हे डीलर्स कंपनीच्या ग्राहकांना वाहन देखभाल, बॅटरी व्यवस्थापन, सुरक्षा तपासणी यासारख्या सेवा प्रदान करतात.

तुनवाल ई-मोटर्स कंपनीने आपल्या आयपीओमध्ये शेअर्सची प्राइस बँड 59 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. एका लॉटमधे कंपनीने 2000 शेअर्स ठेवले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करणीसाठी 1 लाख 18 हजार रुपये जमा करावे लागतील. तुनवाल ई-मोटर्स कंपनीने आपल्या IPO मध्ये 81.72 कोटी रुपये मूल्याचे 138.5 लाख फ्रेश शेअर्स आणि 33.93 कोटी रुपये मूल्याचे 57.5 लाख शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी केले आहेत.

तुनवाल ई-मोटर्स लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तक गटात झुमरमल पन्नाराम तुनवाल, अमितकुमार पन्नाराम माळी आणि झुमरमल पन्नाराम तुनवाल एचयूएफ सामील आहेत. तुनवाल ई-मोटर्स लिमिटेड कंपनी IPO तून मिळालेल्या निव्वळ रक्कमेचा वापर खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, संशोधन आणि विकासासाठी, अजैविक वाढीचा पाठपुरावा करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी खर्च करणार आहे.

या कंपनीचा IPO 15 जुलै ते 18 जुलै दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. गुंतवणूकदारांना शेअरचे वाटप 19 जुलै रोजी केले जाईल. तर 22 जुलै रोजी गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात शेअर जमा केले जातील. 23 जुलै रोजी तुनवाल ई-मोटर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स NSE SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जातील. तुनवाल ई-मोटर्स कंपनीने आपल्या आयपीओमध्ये 50 टक्के कोटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. तर 50 टक्के कोटा इतरांसाठी राखीव ठेवला आहे.

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, तुनवाल ई-मोटर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ही किंमत कंपनीच्या प्राइस बँडच्या तुलनेत 42.3 टक्के अधिक आहे. 2023-24 या आर्थिक वर्षांत तुनवाल ई-मोटर्स लिमिटेड कंपनीच्या महसूल संकलनात 37.85 टक्के वाढ झाली आहे. याच काळात कंपनीचा PAT 217.11 टक्के वाढला आहे. 31 मार्च 2024 तिमाहीत या कंपनीने 105.53 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर याच काळात कंपनीचा PAT 11.81 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

तुनवाल ई-मोटर्स कंपनीने आपल्या आयपीओसाठी व्यवस्थापक आणि बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून होरायझन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला नियुक्त केले आहे. तर आयपीओ रजिस्ट्रार म्हणून कंपनीने

स्कायलाइन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला नियुक्त केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP of Tunwal E-Motors Ltd 15 July 2024.

हॅशटॅग्स

IPO GMP(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x