2 May 2024 1:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
x

Titan Share Price | टाटा ग्रुपचा भरवशाचा शेअर आजही मालामाल करतोय, यापूर्वी दिला 1400 टक्के परतावा

Titan Share Price

Titan Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या बहुतांश कंपन्यांनी दीर्घकाळात आपल्या शेअर धारकांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1400 टक्के परतावा कमावून दिला आहे.

जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी टायटन कंपनीच्या शेअरमध्ये 10,000 रुपये लावले असते ते आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.4 लाख रुपये झाले असते. शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के घसरणीसह 3,398.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

मागील 5 वर्षात टायटन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट गुणाकार केले आहेत. मागील एका वर्षात टायटन कंपनीच्या शेअर धारकांनी 30 टक्केपेक्षा जास्त नफा कमावला आहे. मागील एका वर्षात निफ्टी-50 इंडेक्समध्ये फक्त 7 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. सध्याच्या शेअर होल्डिंग डेटानुसार टायटन कंपनीच्या प्रवर्तकांनी 52.9 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर किरकोळ गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 42.1 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

म्युच्युअल फंड कंपन्यांनी टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीमध्ये 5.28 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर परकीय गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 18.2 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत टायटन कंपनीने 940 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत सप्टेंबर 2023 तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 10 टक्के वाढ झाली आहे. टायटन कंपनीच्या महसुल संकलनात वार्षिक आधारावर 34 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. जुलै ते सप्टेंबर 2023 दरम्यान टायटन कंपनीने 11660 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Titan Share Price NSE 27 November 2023.

हॅशटॅग्स

#Titan Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x