19 May 2024 9:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Stocks To Buy | अल्पावधीत मिळेल तब्बल 35 टक्के परतावा, तज्ज्ञांचा शोभा लिमिटेड शेअर्सबाबत फायद्याचा सल्ला

Stocks To Buy

Stocks To Buy | भारतीय शेअर बाजारातील रियल्टी स्टॉक्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या वर्षी रिअॅल्टी इंडेक्समध्ये 78 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली आहे. तर निफ्टी रियल्टी इंडेक्सचे एकूण बाजार भांडवल 5 लाख कोटी रुपयेवर पोहचले आहेत. ब्रोकरेज फर्म HSBC ने शोभा लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. Sobha Share Price

2023 या वर्षात शोभा लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 75 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ब्रोकरेज फर्मने शोभा लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 35 टक्के वाढवली आहे. आज मंगळवार दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी शोभा लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के घसरणीसह 1,002 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

HSBC फर्मने शोभा लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर टारगेट प्राइस 920 रुपयेवरून वाढून 1240 रुपये केली आहे. केले आहे. मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर 1020 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील आठवड्याच्या क्लोजिंग किमतीच्या तुलनेत शेअर्सची लक्ष्य किंमत 22 टक्के अधिक आहे. शोभा लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांचा उच्चांक पातळी किंमत 1090 रुपये होती तर नीचांक पातळी किंमत 412 रुपये होती.

2024 मध्ये शोभा लिमिटेड कंपनीची कामगिरी तेजीत राहण्याची अपेक्षा आहे. ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, रिअॅल्टी कंपन्याच्या शेअर्सची कामगिरी प्रकल्प लॉन्च आणि व्याजदराच्या हालचालींवर अवलंबून असेल. भारतीय रिअल इस्टेट कंपन्याचे शेअर्स व्याजदराच्या बदलाबाबत अतिशय संवेदनशील आहेत. 2024 मध्ये भारतीय रिअल इस्टेट व्यवसायात विक्री निरोगी राहण्याची शक्यता आहे.

शोभा लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 9700 कोटी रुपये आहे. या कंपनीचे विविध प्रकल्प बेंगळुरू, चेन्नई, कोईम्बतूर, म्हैसूर, पुणे, त्रिशूर, हैदराबाद या शहरांमध्ये सुरू आहेत. मागील एका महिन्यात शोभा लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 18 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 51 टक्के मजबूत झाली आहे. मागील सहा महिन्यांत शोभा लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 85 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 2023 या वर्षात शोभा लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 77 टक्क्यांनी वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy Sobha for investment on 19 December 2023

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x