4 May 2024 8:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Multibagger Stocks | 6 महिन्यांत 63 टक्के पेक्षा अधिक परतावा आणि आता फ्री बोनस शेअर्स जाहीर, शेअर रेकॉर्ड तारखेपूर्वी खरेदीची संधी

Multibagger Stocks

Multibagger Stocks| भारत सरकारच्या अनेक सार्वजनिक उपक्रम कंपन्या शेअर बाजारात ट्रेड करत आहेत. त्यापैकीच एक सरकारी कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्सने आपल्या भागधारकांना 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी प्रत्येक 1 विद्यमान शेअरवर 2 बोनस शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना वितरीत करणार आहे. कंपनीनं जाहीर केल्याप्रमाणे 15 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस व्यवहार पूर्ण करतील.

बोनस शेअर जाहीर :
सरकारी कंपनीची परिस्थिती शेअर बाजारात जास्त चांगली नसते, पण तरीही ही सरकारी कंपनी आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स च्या रुपात मोठी भेट देणार आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी शेअर बाजारात बीईएल या नावाने ओळखली जाते. ही सरकारी कंपनी आपल्या भागधारकांना 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. कंपनीने जाहीर केल्या प्रमाणे प्रत्येक 1 शेअरमागे 2 बोनस शेअर्स भागधारकांना रेकॉर्ड तारीख वर वितरीत करण्यात येतील. 15 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस व्यवहार पूर्ण करतील असे कंपनीने नियमकला कळवले आहे. त्याच वेळी, कंपनीने दिलेल्या बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख 16 सप्टेंबर 2022 असेल. भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा उद्योग एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात पसरला आहे.

शेअर्स नी दिलेला परतावा :
या कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत 63 टक्के पेक्षा अधिक परतावा दिल्याचे समजते. भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या भागधारकांना भरमसाठ परतावा मिळवून दिला आहे. मागील 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये इतकी जास्त वाढ झाली होती की गुंतवणूकदारांनी त्यांतून 63.5 टक्के पेक्षा अधिक नफा कमावला होता 6 महिन्यांपूर्वी 15 मार्च 2022 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर म्हणजेच BSE निर्देशांकमध्ये 205.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 14 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE ट्रेडिंग सेशन संपल्यावर 335.90 रुपये किमतीवर बंद झाले होते. इतर सरकारी कंपनीचे शेअर्स एका वर्षात 59 टक्के पेक्षा अधिक वाढले आहे. त्याच वेळी, भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात 62 टक्के पेक्षा अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे.

दीर्घकाळ गुंतवणुकीचे फायदे :
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये मागील काही वर्षांत भरमसाठ वाढ झाली असून, गुंतवणूकदारांनी ह्या वाढीतून भरपूर नफा कमावला आहे. 1 नोव्हेंबर 2002 रोजी कंपनीच्या शेअर्सची किंमत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर फक्त 5.06 रुपये होती. 14 सप्टेंबर 2022 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स BSE निर्देशांक वर 335.90 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते. 1 नोव्हेंबर 2002 रोजी जर आपण या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपये लावले असते, आणि ही गुंतवणूक दीर्घ कालावधी साठी होल्ड करून ठेवली असती, तर सध्या आपले गुंतवणूक मूल्य 66.38 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Bharat electronics limited share price return on 15 September 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)BEL(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x