3 May 2024 7:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Allcargo Logistics Share Price | मालामाल करणारा शेअर! 150 टक्के परतावा दिला, पुढे अजून मजबूत परताव्याचे संकेत

Allcargo Logistics Share Price

Allcargo Logistics Share Price | शेअर बाजारात चढ-उतार सुरू आहे, आणि बाजार सध्या अस्थिर आहे. अशा काळातही लॉजिस्टिक क्षेत्रातील एका कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. हा शेअर आहे, ‘ऑलकार्गो लॉजिस्टिक लिमिटेड’ कंपनीचा. 16 फेब्रुवारी 2021 रोजी ‘ऑलकार्गो लॉजिस्टिक’ कंपनीचे शेअर्स 130.4 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 20 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 363.95 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील दोन वर्षांच्या कालावधीत या कंपनीच्या स्टॉकने लोकांना 178 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ही कंपनी S&P BSE SmallCap इंडेक्सचा एक भाग आहे. या कंपनीच्या शेअरने मागील दोन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. दोन वर्षांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांना आता 2.79 लाख रुपये परतावा मिळाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Allcargo Logistics Share Price | Allcargo Logistics Stock Price | BSE 532749 | NSE ALLCARGO)

कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यावरून असे कळते की, कंपनीच्या निव्वळ महसुलात 26.80 टक्के वार्षिक घट झाली आहे. कंपनी सध्या 10.17x च्या TTM PE वर ट्रेड करत असून इंडस्ट्री PE 27.70x वर आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये या कंपनीचे ROCE आणि ROE अनुक्रमे 28.4 टक्के आणि 32.4 टक्के वर पोहचले आहे. आजच्या म्हणजेच शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.12 टक्के घसरणीसह 367.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 495.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 249.50 रुपये होती.

ऑलकार्गो लॉजिस्टिक्स ही एक बहुराष्ट्रीय कंपनी असून ती मुख्यतः मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट ऑपरेशन्स, इनलँड कंटेनर डेपो, कंटेनर फ्रेट स्टेशन ऑपरेशन्स, कॉन्ट्रॅक्ट लॉजिस्टिक ऑपरेशन्स, प्रोजेक्ट आणि इंजिनिअरिंग सोल्यूशन्समध्ये विशेष लॉजिस्टिक सेवा आणि सुविधा प्रदान करण्याचे काम करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Allcargo Logistics Share Price 532749 ALLCARGO stock market live on 25 February 2023.

हॅशटॅग्स

Allcargo Logistics Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x