15 May 2024 4:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sakuma Share Price | श्रीमंत बनवणाऱ्या 27 रुपयाच्या शेअरवर तुटून पडले गुंतवणूकदार, यापूर्वी दिला 700% परतावा Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! DA पुन्हा 4% वाढणार, मूळ पगारात होणार असा बदल GTL Share Price | स्वस्त GTL शेअर मालामाल करणार, कंपनीकडून मोठ्या फायद्याची अपडेट आली Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी
x

LIC Share Price | LIC कंपनीबाबत मोठी अपडेट, सकारात्मक बातमीमुळे शेअर्स तेजीत, पुढे किती परतावा मिळेल?

LIC Share Price

LIC Share Price | भारत सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC कंपनीला 10 वर्षांच्या आत 25 टक्के किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग प्रमाण साध्य करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे. एलआयसी कंपनीचे शेअर्स मे 2022 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. भारत सरकारने IPO अंतर्गत LIC कंपनीचे 22.13 कोटी शेअर्स म्हणजेच जवळपास 3.5 टक्के शेअर्स खुल्या बाजारात विकले होते.

भारत सरकारने LIC कंपनीला किमान शेअर धारण प्रमाण साध्य करण्यासाठी सूट देण्यात आली आहे. या बातमीमुळे कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी LIC कंपनीचे शेअर्स 3.62 टक्के वाढीसह 792.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी स्टॉक किमान 788.85 रुपये आणि कमाल 821.00 रुपये या किमती दरम्यान ट्रेड करत होता. या ट्रेडिंग दरम्यान एलआयसी स्टॉक आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर पोहचला होता. एलआयसी कंपनीच्या शेअरची वार्षिक नीचांक किंमत पातळी 530.05 रुपये होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये LIC शेअर्समधील ट्रेडिंग व्हॉल्यूम 10,836,454 शेअर्सवर पोहोचली होती. एलआयसी कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. तर या सरकारी विमा कंपनीचे बाजार भांडवल 5.01 लाख कोटी रुपये आहे.

एलआयसी कंपनीचे शेअर्स आपल्या IPO मधील इश्यू किमतीच्या तुलनेत खूपच कमी किमतीवर सूचीबद्ध झाले होते. आता एलआयसी कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 30.23 टक्के परतावा कमावून दिला आहे. एलआयसी शेअर्सची किंमत मागील 3 महिन्यात 21.73 टक्के वाढली आहे. तर 1 जानेवारी 2023 पासून आतापर्यंत LIC शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना फक्त 15.80 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 16.31 टक्के नफा कमावून दिला आहे. एलआयसी कंपनीमध्ये भारत सरकारने एकूण 96.50 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. नुकताच भारत सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाने एलआयसी कंपनीला स्टॉक लिस्टिंग तारखेपासून 10 वर्षांच्या आत, म्हणजेच मे 2032 पर्यंत 25 टक्के एमपीएस प्रमाण साध्य करण्यासाठी सूट दिली आहे.

2023 या वर्षाच्या सुरुवातीला भारत सरकारने नियम बदल केला होता, जेणेकरून व्यापारी बँकांसह सूचीबद्ध सरकारी कंपन्यांना शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर 25 टक्के एमपीएस प्रमाण सध्या करण्याची आवश्यकता लागणार नाही. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC कंपनीचा IPO 4 मे 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. IPO मध्ये कंपनीने किरकोळ गुंतवणूकदार आणि पात्र कर्मचाऱ्यांसाठी 45 रुपये सूट दिली होती.

कंपनीच्या पॉलिसीधारकांना प्रति शेअर 60 रुपये सूट दिली होती. LIC कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 902 ते 949 रुपये निश्चित केली होती. कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 15 शेअर्स ठेवले होते. LIC कंपनीने आपल्या IPO अंतर्गत 22.13 कोटी इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price NSE 23 December 2023.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(98)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x