12 May 2024 4:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या New Tax Regime Slab | पगारदारांनो! नव्या टॅक्स प्रणालीचे 8 फायदे, इन्कम टॅक्स स्लॅब ते स्टँडर्ड डिडक्शन तपशील नोट करा Post Office Interest Rate | या योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन खर्च भागेल, व्याजातून मिळतील रु.10,250 My EPF Money | नोकरदारांनो! जॉब बदलला आहे? तुमच्या EPF संबंधित हे काम करा, अन्यथा पैशाचे नुकसान अटळ Post Office Scheme | फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये महिना रु.1,000 गुंतवा, मिळतील रु. 8,24,641
x

Stocks To Buy | पैशाने पैसा वाढवा! हा शेअर अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, कमाईची सुवर्ण संधी

Stocks To Buy

Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजार जबरदस्त तेजीत असताना आणि सर्व विक्रमी पातळी ओलांडल्यानंतर आता नवीन वर्षात पाऊल टाकत आहे. तज्ञांच्या मते, 2024 हे नवीन वर्ष शेअर बजारासाठी आणि गुंतवणूकदारांसाठी खूप फायदाचे राहणार आहे. Delhivery Share Price

सध्या जे तुम्ही गुंतवणुकीसाठी उत्तम दर्जाचे शेअर्स शोधत असाल, तर तुम्ही लॉजिस्टिक क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या डेल्हीव्हेरी कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिले. शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी डेल्हीव्हेरी कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के घसरणीसह 387.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, नवीन वर्षात डेल्हीव्हेरी कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. या कंपनीचे शेअर्स सध्या 390 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत आहेत. तज्ञांनी डेल्हीव्हेरी स्टॉक 360-390 रुपये किमतीच्या दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 550 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तरीही गुंतवणुकदारांना तज्ञांनी नुकसान टाळण्यासाठी 310 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. नवीन टार्गेट प्राइस सध्याच्या किंमत पातळीच्या तुलनेत 40 टक्के अधिक आहे.

डेल्हीव्हेरी ही कंपनी भारतातील लॉजिस्टिक क्षेत्रात व्यवसाय करणारी नावजलेली कंपनी मानली जाते. या कंपनीचा लॉजिस्टिक बाजारातील वाटा सातत्याने वाढत आहे. कंपनीच्या क्लायंट लिस्टमध्ये टाटा मोटर्स, हॅवेल्स, मामा अर्थ यासारख्या दिग्गज कंपन्या सामील आहेत. नुकताच डेल्हीव्हेरी कंपनीने AMAZON सोबत देखील भागीदारी केली आहे.

सध्या डेल्हीव्हेरी कंपनीचे शेअर 390 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत आहेत. 5 सप्टेंबर 2023 रोजी डेल्हीव्हेरी कंपनीचे शेअर्स 452 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 27 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 291 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

21 जुलै 2022 रोजी डेल्हीव्हेरी कंपनीच्या शेअरने 708 रुपये ही आपली सार्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. 2023 या वर्षात डेल्हीव्हेरी स्टॉकची किंमत फक्त 17 टक्के वाढली आहे. अशा स्थितीत शेअरमध्ये मजबूत चढउतार पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy call on Delhivery Share Price 23 December 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x