19 May 2024 3:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड स्टॉक तेजीत वाढतोय, तज्ज्ञांचा टार्गेट प्राइस जाहीर करून गुंतवणूकीचा सल्ला

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | हिंदुजा ग्रुपचा भाग असलेल्या अशोक लेलँड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशोक लेलँड ही मध्यम आणि जड व्यावसायिक वाहने बनवणारी भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. अशोक लेलँड कंपनीच्या व्यावसायिक वाहनांच्या मागणीमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळत आहे.

रोड, इन्फ्रा आणि खाणकाम क्षेत्रातील तेजीमुळे अशोक लेलँड कंपनीचा व्यावसायिक दृष्टीकोन सकारात्मक आहे. मागील आठवड्यात अशोक लेलँड स्टॉक 172 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी अशोक लेलँड स्टॉक 0.84 टक्के वाढीसह 173.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअरखान फर्मने आपल्या अहवालात नमूद केले आहे की, अशोक लेलँड कंपनी पुढील काळात दुहेरी अंकी EBITDA मार्जिन साध्य करू शकते. वाहनाच्या मागणीमधील मजबूत दृष्टीकोनात स्थिरता पाहायला मिळत आहे. अशोक लेलँड कंपनीला बस निर्मिती विभागात अनेक नवीन ऑर्डर मिळत आहे. यासह अशोक लेलँड कंपनीला आर्थिक वर्ष 2024 मध्ये संरक्षण क्षेत्रातून 800-1000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळण्याची अपेक्षा आहे.

अशोक लेलँड कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनात देखील मोठी गुंतवणूक करत आहे. चालू आर्थिक वर्षात अशोक लेलँड कंपनीने आपल्याच व्यवसायात 662 कोटी रुपयेची गुंतवणूक केली आहे. मुळात कंपनीची गुंतवणूक योजना 1200 कोटी रुपयेची आहे.

अनेक ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी 221 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. ही टार्गेट प्राइस सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 30 टक्के जास्त आहे. अशोक लेलँड कंपनीच्या एकूण महसूल संकलनात 87 टक्के महसूल देशांतर्गत व्यवसायातून येतो.

अशोक लेलँड कंपनीचा जवळपास 70 टक्के महसूल मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहन विक्री विभागातून संकलित केला जातो. तर 30 टक्के महसूल LCVs म्हणजेच हलक्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतून येतो. बस विभागात अशोक लेलँड कंपनी मार्केट लीडर म्हणून ओळखली जाते याबाबत अशोक लेलँड कंपनीने 41 टक्के मार्केट काबीज केला आहे. ट्रक विभागात अशोक लेलँड कंपनी भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी मानली जाते. यामध्ये कंपनीचा एकूण मार्केट वाटा 33 टक्के असून त्यांतून देशांतर्गत महसूल प्रमाण 87 टक्के आणि निर्यात महसूल प्रमाण 13 टक्के आहे.

मागील आठवड्यात अशोक लेलँड स्टॉक 172 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 191 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 133 रुपये होती. अशोक लेलँड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 50 हजार कोटी रुपये आहे.

मागील तीन महिन्यांत अशोक लेलँड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 4 टक्के नकारात्मक परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात अशोक लेलँड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 26 December 2023.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x