14 December 2024 11:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या
x

Multibagger Mutual Fund | पैसाच पैसा! या म्युचुअल फंड स्कीम देत आहेत बक्कळ परतावा, अल्पावधीत पैसे दुप्पट, संधी सोडू नका

Multibagger Mutual fund

Multibagger Mutual Fund | आज या लेखात आपण म्युच्युअल फंडाद्वारे ऑफर केलेल्या एका टॉप रेटेड इक्विटी म्युच्युअल फंड बद्दल माहिती घेणार आहोत. या म्युचुअल फंडाने SIP पद्धतीने तसेच एकरकमी गुंतवणुकीच्या माध्यमातून गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाने आपल्या बेंचमार्कपेक्षा एकरकमी गुंतवणुकीवर मजबूत परतावा मिळवून दिला आहे. चला तर मग या म्युचुअल फंडाचे सर्व तपशील जाणून घेऊ.

AUM आणि NAV प्रमाण :
SBI कॉन्ट्रा म्युचुअल फंड 14 जुलै 1999 रोजी लाँच करण्यात आला होता. हा म्युचुअल फंड 19 वर्ष जुना असून एक ओपन एंडेड प्रकारचा म्युच्युअल फंड आहे. या म्युचुअल फंडचा समावेश कॉन्ट्रा श्रेणी इक्विटी फंडमध्ये होतो. या म्युचुअल फंडमध्ये कोणताही लॉक-इन कालावधी नाही. 31 ऑक्टोबर 2022 रोजी या म्युचुअल फंडाची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता/AUM 6,694 कोटी रुपये आहे. डायरेक्ट प्लॅन म्युचुअल फंडाच्या ग्रोथ ऑप्शन अंतर्गत, या म्युचुअल फंड योजनेची नेट अॅसेट व्हॅल्यू/NAV 15 नोव्हेंबर 2022 रोजी 243.0931 रुपये नोंदवण्यात आली आहे.

म्युचुअल फंड रेटिंग :
ही म्युचुअल फंड स्कीम S&P BSE 500 निर्देशांक बेंचमार्क म्हणून फॉलो करते. व्हॅल्यू रिसर्च आणि क्रिसिल या दोन्ही दिग्गज संस्थांनी या म्युचुअल फंडाला 5 स्टार रेटिंग देऊन त्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तथापि, गुंतवणूक करण्यासाठी हा खूप जास्त जोखम असलेला म्युचुअल फंड मानला जातो. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आपल्या गुंतवणूकदारांना परस्परविरोधी गुंतवणूक धोरणानुसार इक्विटी आणि इक्विटी संबंधित सिक्युरिटीजच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन नफा कमावून देणे आणि पोर्टफोलिओ ची विविधता वाढवणे हा आहे.

किमान गुंतवणूक रक्कम :
या म्युचुअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान गुंतवणूक मर्यादा 5,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. किमान SIP गुंतवणूक मर्यादा 500 रुपये आहे. अतिरिक्त किमान गुंतवणूक रक्कम मर्यादा 1,000 रुपये आणि किमान शिल्लक 1,000 रुपये निश्चित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या म्युचुअल फंड योजनेतून पैसे काढण्याची किमानरक्कम 500 रुपये असेल. गुंतवणूक सुरू केल्यावर 365 दिवसांच्या आत रिडेम्प्शनवर एक्झिट लोड म्हणून 1 टक्के शुल्क आकारला जाईल. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत या योजनेत खर्चाचे प्रमाण 1.06 टक्के होते.

वार्षिक परतावा :
एकरकमी गुंतवणुकीत या फंडाने 1 वर्षात 11.16 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2 वर्षात 41.45 टक्के, 3 वर्षात 31.61 टक्के आणि 5 वर्षात 15.34 टक्के परतावा मिळवून दिला आहे. SIP योजने अंतर्गत या म्युचुअल फंडाने गेल्या 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 22.85 टक्के परतावा, 2 वर्षात 26.44 टक्के परतावा, 3 वर्षात 36.51 टक्के परतावा आणि 5 वर्षात 25.28 टक्के परतावा कमावून दिला आहे.

म्युचुअल फंड पोर्टफोलिओ :
या म्युचुअल फंडाच्या एकूण गुंतवणुकीपैकी 88.06 टक्के पैसे इक्विटी शेअर्समध्ये लावले आहे. उर्वरित 9.27 टक्के रक्कम कर्ज आणि 2.67 टक्के रक्कम रोख आणि रोख समतुल्य गुंतवणूक पर्यायामध्ये लावली आहे. या म्युचुअल फंडाने तब्बल 75 कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले आहे. यामध्ये वित्त सेवा सुविधा, तंत्रज्ञान विकास, ऊर्जा निर्मिती, ऑटोमोबाईल उद्योग, हेल्थकेअर सेवा, कंझ्युमर स्टेपल्स, मटेरियल, धातू आणि खाणकाम, सर्व्हिस सेक्टर, रसायने उत्पादन, भांडवली वस्तू निर्मिती, बांधकाम उद्योग, ग्राहक विवेकाधिकार, दळणवळण सेवा, विमा आणि वस्त्रोद्योग यासारख्या मोठ्या आणि देशाच्या विकासाला हातभार लावणाऱ्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश होतो.

टॉप 10 गुंतवणूक :
या म्युचुअल फंडाच्या टॉप 10 होल्डिंग्समध्ये ICICI बँक, HDFC बँक, इन्फोसिस, ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचसीएल टेक्नॉलॉजीज, एस्टर डीएम हेल्थकेअर, ITC, अॅक्सिस बँक आणि टेक महिंद्रा यांसारख्या दिग्गज लार्ज कॅप कंपनीचा समावेश होतो. तुमचे उत्पन्न कमी असेल मात्र तुम्ही काटकसर करून बचत करत असाल तर ते पैसे म्युचुअल फंडात गुंतवणूक करा. तुमच्या उत्पन्नातील किमान 20 टक्के रक्कम बचत करण्याचा प्रयत्न करा. एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही दर महिन्याला अल्प गुंतवणूक करून मोठा फंड निर्माण करून शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Mutual fund Scheme of SBI Contra Mutual Fund investment and earning huge returns on 21 November 2022.

हॅशटॅग्स

Multibagger Mutual Fund(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x