13 May 2024 9:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

HUDCO Share Price | ऑर्डरबुक मजबूत! स्वस्त हुडको शेअर्सची खरेदी वेगात, एका दिवसात 20 टक्के परतावा दिला

HUDCO Share Price

HUDCO Share Price | हुडको म्हणजेच गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह 136.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे.

बुधवारी हुडको कंपनीने गुजरात सरकारसोबत 14,500 कोटी रुपये मूल्याचा करार केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे गुरुवारी हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. आज शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी हुडको स्टॉक 1.68 टक्के घसरणीसह 125.85 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

हुडको कंपनीने बुधवारी सेबीला कळवले की, कंपनीने आपल्या गृहनिर्माण आणि शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी 14,500 कोटी रुपये मूल्याचा करार केला आहे. गुजरात सरकारसोबतच्या या करारात विविध गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या माध्यमातून गुजरात राज्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे.

हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच हुडको कंपनीने गुजरात राज्यातील गृहनिर्माण आणि नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी 14,500 कोटी रुपये गुंतवणूकीचा सामंजस्य करार केला आहे. 2023 या वर्षात पायाभूत प्रकल्पात 150 टक्के वाढ झाली आहे. 2023 च्या सुरुवातीपासून हुडको कंपनीचे शेअर्स सातत्याने तेजीत वाढत आहेत.

YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 136.70 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 40.50 रुपये होती. हुडको कंपनीचे एकूण बाजार भांडवल 26,002.68 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HUDCO Share Price NSE Live 29 December 2023.

हॅशटॅग्स

Hudco Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x