
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून तज्ञांच्या रडारवर आले आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड कर होते. मात्र आज हा स्टॉक किंचित वाढीसह व्यवहार करत आहे.
व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स मंगळवारी 6 टक्के घसरणीसह 15.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.93 टक्के वाढीसह 16.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे, व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपनीने एलोन मस्कच्या स्टारलिंकसोबत कोणत्याही संभाव्य टाय-अपबद्दलच्या मीडियामधील अफवांना नकार दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया स्टॉक 15.95 रुपये किमतीवर आला होता. तर सोमवारी हा स्टॉक 17 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
स्टारलिंक सोबतच्या संभाव्य कराराच्या अफवेमुळे 1 जानेवारी 2021 रोजी लक्षणीय वाढलेला व्होडाफोन आयडिया स्टॉक 2 जानेवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6 टक्के पडला होता. मागील सहा महिन्यांत व्होडाफोन आयडिया स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 114 टक्के परतावा कमावून दिला आहे. व्होडाफोन आयडिया कंपनी सध्या मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत आहे. व्होडाफोन आयडिया कंपनी आदित्य बिर्ला ग्रुप आणि व्होडाफोन पीएलसी या प्रवर्तकांच्या माध्यमातून विविध स्त्रोतांतर्फे भांडवल उभारणीचा प्रयत्न करत आहे.
व्होडाफोन आयडिया कंपनीच्या दोन्ही मुख्य प्रवर्तकांनी ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीच्या अखेरीस भांडवल उभारणी करणे अपेक्षित होते. त्यांना अद्याप यश आलेले नाही. व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरने मागील पाच दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना 21 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 114 टक्के वाढली आहे. या काळात व्होडाफोन आयडिया स्टॉक 7.55 रुपये किमतीवरून वाढून सध्याच्या किंमतीवर पोहचला आहे. मागील एका वर्षात व्होडाफोन आयडिया स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 103 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2015 मध्ये व्होडाफोन आयडिया या कंपनीचे शेअर्स 118 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.