21 May 2024 5:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | शेअर प्राईस 21 रुपये! 6 महिन्यात दिला 109% परतावा, यापूर्वी दिला 2590% परतावा Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 22 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Narmada Agrobase Share Price | 24 रुपयाचा शेअर मालामाल करणार, सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदीला गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा, स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत दिला 71% परतावा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट
x

Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्स 'पॉवर' दाखवणार, अल्पावधीत मजबूत कमाई होईल, टार्गेट प्राइस जाहीर

Adani Power Share Price

Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. मागील वर्षी हिंडेनबर्ग अहवालामुळे अडचणीत आलेल्या अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी देखील आता अदानी समूहातील कंपन्याच्या शेअर्सवर विश्वास व्यक्त केला आहे.

शेअर बाजारातील अनेक तज्ञ अदानी पॉवर स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. व्हेंचुरा सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, अदानी पॉवर स्टॉक पुढील काही महिन्यांत 700 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आज गुरूवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 1.01 टक्के वाढीसह 550 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

वेंचुरा सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, अदानी पॉवर स्टॉक पुढील काही महिन्यांत 700 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. सध्या अदानी पॉवर स्टॉक 550 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. नूतनीकरणक्षम ऊर्जेवर लक्ष केंद्रित केल्याने अदानी पॉवर कंपनीच्या ऊर्जा उत्पादन क्षमतेत वाढ झाली आहे. आणि विजेची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

अदानी पॉवर कंपनी ही भारतातील सर्वात मोठी खाजगी औष्णिक ऊर्जा कंपनी म्हणून ओळखली जाते. अदानी पॉवर कंपनीची सध्याची ऊर्जा निर्मिती क्षमता 15.2 GW आहे. आणि कंपनीची अतिरिक्त ऊर्जा निर्मिती क्षमता 1.6 GW आहे.

अदानी पॉवर कंपनीची एकूण ऊर्जा निर्मिती क्षमता भारताच्या एकूण 214 GW क्षमतेच्या फक्त 7.1 टक्के आहे. अदानी पॉवर कंपनीची वीज निर्मिती क्षमता आर्थिक वर्ष 2021 मध्ये 12.4 GW होती. त्यात वाढ होऊन आर्थिक वर्ष 2023 च्या अखेरीस कंपनीची क्षमता 13.6 GW वर पोहोचली आहे. आर्थिक वर्ष 2027 पर्यंत अदानी पॉवर कंपनीची ऊर्जा निर्मिती क्षमता 16.8 GW वर जाऊ शकते.

तज्ञांच्या मते, अदानी पॉवर कंपनीचा महसूल वार्षिक 7 टक्क्यांच्या वाढीसह 47,000 कोटी रुपयेवर जाऊ शकतो. आणि कंपनीचा एबिटा 12 टक्क्यांच्या वाढीसह 2023-26 पर्यंत 14,080 कोटी रुपयेवर जाऊ शकतो. या कालावधीत अदानी पॉवर कंपनीचा EBITDA मार्जिन 400 बेसिस पॉइंट्स वाढू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Power Share Price NSE Live 04 January 2024.

हॅशटॅग्स

#Adani Power Share Price(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x