13 December 2024 8:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Bonus Shares | 'एक पे दो' फुकट शेअर्स मिळतील, अल्पावधीत 3857% परतावा देणारा शेअर खरेदी करा

Bonus Shares

Bonus Shares | इंटेलिवेट कॅपिटल वेंचर्स या वित्तीय सल्ला देणाऱ्या कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. इंटेलिवेट कॅपिटल वेंचर्स कंपनी आपल्या शेअरधारकांना 2 : 1 या प्रमाणात मोडत बोनस शेअर वाटप करणार आहे. Intellivate Capital Share Price

ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. या कंपनीने अद्याप बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख जाहीर केली नाहीये. इंटेलिवेट कॅपिटल वेंचर्स कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना पहिल्यांदाच मोफत बोनस शेअर्स वाटप करत आहे. आज गुरूवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी इंटेलिवेट कॅपिटल वेंचर्स कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के घसरणीसह 118.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका वर्षात इंटेलिवेट कॅपिटल वेंचर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 937 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2 जानेवारी 2023 रोजी इंटेलिवेट कॅपिटल वेंचर्स कंपनीचे शेअर्स 11.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 2 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 120.70 रुपये किमतीवर पोहोचले होते.

मागील 6 महिन्यांत इंटेलिवेट कॅपिटल वेंचर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 425 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 जुलै 2023 रोजी इंटेलिवेट कॅपिटल वेंचर्स कंपनीचे शेअर्स 22.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने लोकांचे पैसे 32 टक्क्यांनी वाढवले आहेत. इंटेलिव्हेट कॅपिटल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 128.21 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 11.63 रुपये होती.

मागील तीन वर्षांत इंटेलिव्हेट कॅपिटल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3857 टक्के परतावा कमावून दिला आहे. 6 जानेवारी 2021 रोजी इंटेलिवेट कॅपिटल वेंचर्स कंपनीचे शेअर्स 3.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी इंटेलिव्हेट कॅपिटल कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 39.57 लाख रुपये झाले असते. मागील 2 वर्षांत इंटेलिवेट कॅपिटल वेंचर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1423 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Intellivate Capital Share Price NSE Live 04 January 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x