15 December 2024 1:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

Vakrangee Share Price | शेअरची किंमत 24 रुपये, प्रचंड तेजीत, 2 दिवसात 22% परतावा दिला, स्टॉक तपशील जाणून घ्या

Vakrangee Share Price

Vakrangee Share Price | वकरंजी लिमिटेड कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. आयटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या वकरंजी लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 13 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.

शुक्रवारी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त शेअर बाजाराला सुट्टी होती. आणि आज सोमवार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी वकरंजी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8.32 टक्के वाढीसह 24.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वकरंजी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 23.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 26.05 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 13.70 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,423.11 कोटी रुपये आहे.

डिसेंबर 2023 तिमाहीपर्यंत वकरंजी लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 42.60 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे एकूण 57.40 टक्के भाग भांडवल धारण केले होते. वकरंजी लिमिटेड कंपनीमध्ये सर्वाधिक भाग भांडवल वकरंजी होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने धारण केले आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये या कंपनीचे जवळपास 25,09,50,388 शेअर्स आहेत. याचे प्रमाण एकूण भाग भांडवलाच्या 23.69 टक्के आहे.

NJD कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने देखील वकरंजी लिमिटेड कंपनीचे 12 टक्क्यांपेक्षा जास्त भाग भांडवल धारण केले आहे. वकरंजी लिमिटेड कंपनीची स्थापना 1990 साली झाली होती. ही कंपनी मुख्यतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी ग्रामीण, निमशहरी आणि शहरी लोकसंख्येसाठी आयटी संबधित सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. कंपनी सध्या एटीएम, ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक सेवा यासारख्या क्षेत्रात व्यवसाय विस्तार करत आहे.

वकरंजी लिमिटेड ही कंपनी भारतात 31 राज्यातील 560 जिल्ह्यांमध्ये आपल्या सेवा प्रदान करते. या कंपनीचे सुमारे 21,240 आउटलेट भारतात कार्यरत आहेत. नुकताच कंपनीने रिअल-टाइम कॅश काढण्याची सुविधा सक्षम करणारे व्हाइट लेबल एटीएम स्थापित करण्यासाठी आरबीआयकडून परवाना मिळवला आहे. आता ही कंपनी ग्रामीण भारतात आपल्या सेवा देणारी चौथी सर्वात मोठी एटीएम सेवा प्रदाता कंपनी बनली आहे. या कंपनीच्या सेवा घेणाऱ्या बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँक तसेच बँक ऑफ बडोदा यासारख्या अनेक सरकारी बँका आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vakrangee Share Price NSE Live 29 January 2024.

हॅशटॅग्स

Vakrangee Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x