15 May 2024 5:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Reliance Power Share Price | शेअरची किंमत 30 रुपये! अल्पवधीत मोठा परतावा मिळतोय, कंपनीबाबत मोठी अपडेट आली

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | अनिल अंबानीं यांच्या सर्व कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला तोंड देत आहेत. त्यामुळे गुंतवणुकदारांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 2.06 टक्के वाढीसह 30.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

8 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 33.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 0.66 टक्के वाढीसह 30.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील सहा महिन्यांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 82 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 140 टक्के परतावा कमावून दिला आहे. रिलायन्स पॉवर कंपनीच्या प्रवर्तकाकडे डिसेंबर 2023 पर्यंत 24.49 टक्के भाग भांडवल होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 75.51 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

कंपनीचे प्रवर्तक अनिल अंबानी यांच्याकडे रिलायन्स पॉवर कंपनीचे 4,65,792 शेअर्स आहेत. तर त्यांची पत्नी टीना अंबानी यांच्याकडे कंपनीचे 4,12,708 शेअर्स आहेत. अनिल अंबानींच्या दोन्ही मुलांकडे रिलायन्स पॉवर कंपनीचे 4,17,500 शेअर्स आहेत. याव्यतिरिक्त रिलायन्स पॉवर कंपनीच्या प्रवर्तक गटात रिलायन्स इन्फ्रा कंपनी देखील सामील आहे. रिलायन्स इन्फ्रा कंपनीने रिलायन्स पॉवर कंपनीचे 93,01,04,490 शेअर्स धारण केले आहेत.

27 जानेवारी 2024 रोजी रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीने सेबीला माहिती दिली की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 3 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत, कंपनी डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. सप्टेंबर 2023 तिमाहीत उच्च महसुल संकलनासह रिलायन्स पॉवर कंपनीने आपला तोटा 237.76 कोटी पर्यंत कमी केला होता. सप्टेंबर 2023 तिमाहीत या कंपनीचे एकूण महसूल उत्पन्न वाढून 2130 कोटी रुपये नोंदवले होते.

रिलायन्स पॉवर ही कंपनी मुख्यतः वीज निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये कोळसा, वायू, जल, पवन आणि सौर ऊर्जा यासारखे पर्याय सामील आहेत. रिलायन्स पॉवर कंपनीची कार्यरत वीज निर्मिती क्षमता सध्या 416 GW आहे. या कंपनीची स्थापना 1995 साली करण्यात आली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 30 January 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x