14 May 2024 10:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Oswal Greentech Share Price | शेअरची किंमत 45 रुपये! एका महिन्यात दिला 50 टक्के परतावा, खरेदी करणार?

Oswal Greentech Share Price

Oswal Greentech Share Price | ओसवाल ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 37.74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत.

रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या ओसवाल ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 20 मार्च 2023 रोजी 16.96 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी ओसवाल ग्रीनटेक स्टॉक 19.52 टक्के वाढीसह 45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

डिसेंबर 2023 मध्ये ओसवाल ग्रीनटेक कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 64.34 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे एकूण 35.66 टक्के भाग भांडवल धारण केले होते. कंपनीचे प्रवर्तक अरुण ओसवाल यांच्या पोर्टफोलिओमध्ये कंपनीचे सर्वाधिक म्हणजेच 5,15,44,618 शेअर्स आहेत. हे प्रमाण कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 20.07 टक्के आहे. यासह ओसवाल ॲग्रो मिल्स लिमिटेड कंपनीने ओसवाल ग्रीनटेक कंपनीचे 11,36,47,217 शेअर्स होल्ड केले आहेत. हे शेअर्स कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 44.25 टक्के आहेत.

मागील एका आठवड्यात ओसवाल ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 25.26 टक्के परतावा कमावून दिला आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सची किंमत 40.72 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे.

शुक्रवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शेअर बाजार, विदेशी चलन विनिमय बाजार आणि सराफा आणि सर्व कमोडिटी मार्केटला सुट्टी होती. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 359.64 अंकांच्या म्हणजेच 0.51 टक्क्यांच्या घसरणीसह 70,700.67 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी निर्देशांक 101.35 अंकांच्या म्हणजेच 0.47 टक्के घसरणीसह 21,352.60 अंकांवर क्लोज झाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Oswal Greentech Share Price NSE Live 29 January 2024.

हॅशटॅग्स

Oswal Greentech Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x