20 May 2024 11:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स पैसा गुणाकारात वाढवणार, शेअर मधील तेजीचे कारण काय?

Adani Port Share Price

Adani Port Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक असाच तेजीत वाढत होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पोर्ट कंपनीचे शेअर्स इंट्राडे ट्रेडमध्ये 2.3 टक्के वाढीसह 1,119 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे.

ब्रोकिंग फर्म HSBC ने अदानी पोर्ट कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस वाढवली आहे. HSBC ने अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 920 रुपयेवरून वाढवून 1,250 रुपये प्रति शेअर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी अदानी पोर्ट स्टॉक 2.70 टक्के वाढीसह 1,153.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच सर्वोच्च न्यायालयाने अदानी समूहाला हिंडनबर्ग फर्मच्या आरोपात क्लिन चिट दिली आहे. त्यामुळे अदानी समुहाच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्मने अदानी पोर्ट कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग दिली आहे. मागील एका आठवड्यात अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 9 टक्के परतावा कमावून दिला आहे. HSBC फर्मच्या मते अदानी पोर्ट कंपनीचा ROIC आर्थिक वर्ष 2023 मध्ये 13 टक्के आहे. जो आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 17 टक्के वाढण्याची अपेक्षा आहे.

नुकताच हिंडनबर्ग वादात सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले की, अदानी समूहाच्या विरुद्ध केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक किंवा संस्थेकडून चौकशी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. याचा कोणताही आधार बनत नाही. ही बातमी येताच बुधवारी अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे शेअर्स सुसाट तेजीत वाढू लागले होते.

सर्वोच्च न्यायालयाने अदानी समूह प्रकरणात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाला पुढील तीन महिन्यांत तपास पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 24 नोव्हेंबर 2026 रोजी अदानी समुहाच्या याचिकांवरील निकाल राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हंटले की, बाजार नियामक सेबीने कशी चौकशी केली, याबद्दल शंका घेण्याचे कोणतेही कारण स्पष्ट दिसत नाही.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Port Share Price NSE Live 05 January 2024.

हॅशटॅग्स

Adani Port Share Price(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x