11 December 2024 2:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम
x

Reliance Capital Share Price | शेअरची किंमत 14 रुपये! आज 4.69 टक्के वाढला, रिलायन्स कॅपिटल अजून किती परतावा देईल?

Reliance Capital Share Price

Reliance Capital Share Price | अनिल अंबानी यांच्या बऱ्याच कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. त्यापैकीच एक रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स 2008 मध्ये 2700 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता 3 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 13.11 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स कॅपिटल स्टॉक 4.06 टक्के वाढीसह ट्रेड करत होता.

मार्च 2023 मध्ये रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअरने 7.60 रुपये किंमत पातळी स्पर्श केली होती. 2023 या वर्षात रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअर्समध्ये फक्त 11 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी रिलायन्स कॅपिटल स्टॉक 4.69 टक्के वाढीसह 14.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

रिलायन्स कॅपिटल कंपनीमध्ये प्रवर्तकाचा वाटा एकूण 0.88 टक्के आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 98.49 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. अनिल अंबानी यांच्या कुटुंबाकडे रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या वैयक्तिक प्रवर्तकांच्या गटातील फक्त 2,91,961 शेअर्स आहेत. मात्र त्यातही अनिल अंबानींकडे एकही शेअर्स नाहीये. अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी यांनी कंपनीचे 2,63,474 शेअर्स होल्ड केले आहेत. तर अनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानी यांच्याकडे रिलायन्स कॅपिटल कंपनीचे 28487 शेअर्स आहेत.

रिलायन्स कॅपिटल फोमोनी संपूर्ण प्रवर्तक गटाकडे कंपनीचे एकूण 19,34,405 शेअर्स आहेत. नुकताच भारतीय स्पर्धा आयोगाने इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेड, IIHL BFSI (इंडिया) लिमिटेड आणि एशिया एंटरप्राइजेस LLP द्वारे रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीमधील स्टेक संपादन करण्याची परवानगी दिली आहे. हे प्रस्तावित संयोजन इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड, IIHL BFSI ( इंडिया ) लिमिटेड, आणि Aasia Enterprises LLP द्वारे रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीमध्ये शेअर्स संपादन करून नियंत्रण मिळवण्याशी संबंधित आहे. IIHL BFSI आणि आशिया यापुढे रिलायन्स कॅपिटल कंपनीचे संयुक्तपणे अधिग्रहणकर्ता म्हणून ओळखले जाणार आहेत. रिलायन्स कॅपिटल कंपनी सध्या दिवाळखोरी संहिता अंतर्गत निराकरण प्रक्रियेला सामोरे जात आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Capital Share Price NSE Live 05 January 2024.

हॅशटॅग्स

#Reliance Capital Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x