
Reliance Power Share Price | दिवाळखोर उद्योगपती अनिल अंबानीं यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने अल्पावधीत खळबळ माजवली आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये खूप कमी काळात मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 32.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सने नुकताच आपली वार्षिक उच्चांक किंमत पातळी देखील स्पर्श केली आहे.
रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील 5 दिवसात आपल्या गुंतवणुकदारांना 39 टक्के परतावा कमावून दिला आहे. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स आता आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 265 टक्के मजबूत झाले आहेत. शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 2.63 टक्के वाढीसह 31.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
मागील 4 वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 2800 टक्के वाढली आहे. 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 1.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीच्या शेअर्सने 32.99 रुपये किंमत स्पर्श केली होती.
मागील ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर स्टॉकमध्ये 2 मोठे ब्लॉक डील झाले आहेत. BSE डेटानुसार , Hrti Pvt Ltd कंपनीने रिलायन्स पॉवर कंपनीचे 1.95 कोटी शेअर्स सरासरी 28.76 रुपये किमतीवर खरेदी केले होते. तर एक विक्रीचा व्यवहार 28.64 रुपये किमतीवर झाला ज्यात 1.86 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकण्यात आले होते.
गेल्या 6 महिन्यांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 130 टक्के परतावा कमावून दिला आहे. 5 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 14.37 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 5 जानेवारी 2024 रोजी हा स्टॉक 32.99 रुपये किमतीवर पोहचला होता.
मागील एका महिन्यात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 47 टक्के वाढली आहे. या काळात शेअर्सची किंमत 22.30 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचली आहे. रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 9.05 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 32.99 रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.