14 December 2024 11:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Adani Green Energy Share Price | मित्रो! गुजरात राज्य सरकारकडून अदानी ग्रीन एनर्जी कंपनीला 25 वर्षांचं कंत्राट, शेअरला फायदा होणार?

Highlights:

  • Adani Green Energy Share Price
  • तीन महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
  • मागील 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 100% परतावा
  • गुजरात राज्य सरकार कडून 25 वर्षांसाठी कंत्राट
Adani Green Energy Share Price

Adani Green Energy Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या ‘अदानी विंड एनर्जी कच्छ फाइव्ह लिमिटेड’ कंपनीने गुजरात राज्यात नवीन पवन ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. या वीज प्रकल्पाची क्षमता 130 मेगावॅट असणार आहे. अदानी ग्रुपचा हा पॉवर प्लांट गुजरात राज्यात कच्छमध्ये उभारण्याचे प्रस्तावित आहे. काल शुक्रवारी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.64 टक्क्यांच्या घसरणीसह 964.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

तीन महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट

मागील तीन महिन्यांत अदानी ग्रीन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीची कार्यरत पवन निर्मिती क्षमता 1101 मेगावॅटवर पोहचली आहे. त्याच वेळी कंपनीची ऑपरेशनल नूतनीकरणक्षम उत्पादन क्षमता एकूण 8216 मेगावॅटपर्यंत पोहचली आहे.

मागील 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 100% परतावा

अदानी ग्रीन कंपनीने जाहीर केलेल्या माहितीत म्हंटले आहे की, 2030 पर्यंत कंपनीची अक्षय ऊर्जा पोर्टफोलिओची क्षमता 45 GW पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य कंपनीने निर्धारित केले आहे. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे.

गुजरात राज्य सरकार कडून 25 वर्षांसाठी कंत्राट

अदानी ग्रीन एनर्जी कंपनीला गुजरात राज्य सरकार कडून 25 वर्षांसाठी कंत्राट मिळाले आहे. अदानी विंड एनर्जी कच्छ फाइव्ह लिमिटेड कंपनीने शुक्रवारी माहिती दिली होती की, या प्लांटमध्ये निर्माण केल्या जाणाऱ्या वीजेची खरेदी सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून केली जाणार आहे. अदानी समूहाची ही कंपनी सरकारी कंपनीला 2.83 रुपये प्रति किलोवॅट या दराने सौरऊर्जा द्वारे निर्मित वीज पुरवठा करणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Adani Green Energy Share Price today on 27 May 2023.

हॅशटॅग्स

#Adani Green Energy Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x