
Integra Essentia Share Price | इंटेग्रा एसेंशिया या मागील काही दिवसांपासून तेजीत वाढणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात किंचित तेजी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 470 अंकांच्या वाढीसह 71,840 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 168 अंकांच्या वाढीसह 21680 अंकांवर ट्रेड करत होता.
या तेजीच्या काळात LIC कंपनीने गुंतवणूक केलेल्या इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 9.83 टक्क्यांच्या वाढीसह 12.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. इंटेग्रा एसेंशिया या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 587 कोटी रुपये आहे. आज बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 3.50 टक्के घसरणीसह 12.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 5 दिवसात इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 28 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. 11 डिसेंबर 2023 रोजी इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 6 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 12.40 रुपये किमतीवर पोहचला आहे.
अवघ्या एका महिन्यात इंटेग्रा एसेंशिया स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 113 टक्के नफा कमावून दिला आहे. 7 मार्च 2022 रोजी इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 1.65 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवरून 680 टक्के वाढले आहेत. इंटेग्रा एसेंशिया या स्मॉल कॅप कंपनीमध्ये लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन कंपनीने देखील गुंतवणूक केली आहे.
LIC कंपनीने इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे जवळपास 48.59 लाख शेअर्स होल्ड केले आहेत. LIC कंपनीने इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 5 रुपये किमतीवर खरेदी केले होते. मागील 3 वर्षांत, इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सची किंमत 39 पैशांवरून 3300 टक्क्यांनी वाढली आहे.
2023 या वर्षात इंटेग्रा एसेंशिया कंपनीने 270 कोटी रुपये मूल्याची विक्री केली आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनीच्या विक्रीत 15 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. नवी दिल्ली स्थित इंटेग्रा एसेंशिया ही कंपनी मुख्यतः अन्न आणि ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.