22 May 2024 6:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | शेअर प्राईस 21 रुपये! 6 महिन्यात दिला 109% परतावा, यापूर्वी दिला 2590% परतावा Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 22 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Narmada Agrobase Share Price | 24 रुपयाचा शेअर मालामाल करणार, सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदीला गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा, स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत दिला 71% परतावा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट
x

Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडात दररोज फक्त 167 रुपये जमा करून 11.33 कोटी रुपये परतावा मिळेल, संपूर्ण गणित समजून घ्या

Mutual fund SIP

Mutual Fund SIP | आपल्याला सर्वांना आयुष्यात श्रीमंत व्हायचे आहे, पण त्यासाठी आपण गुंतवणूक करणे गरजेचे आहे. जर तुम्हीही करोडपती होण्याचे स्वप्न पाहत असाल तर या लेखात आम्ही तुम्हाला म्युचुअल फंड SIP बद्दल माहिती देणार आहोत. तुम्ही म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करून जबरदस्त परतावा मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ की छोटी गुंतवणूक करून तुम्ही करोडपती कसे बनू शकता.

जवळजवळ प्रत्येकजण नोकरीतून निवृत्त झाल्यावर नंतर आर्थिक खर्चाची सोय कशी करावी याची चिंता करत असतो. पण महागाई च्या या काळात सर्व खर्च भागवून मोठी गुंतवणूक करणे खूप अवघड होऊन जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही छोट्या गुंतवणुकीत मोठा परतावा मिळवायचा असेल तर या लेखात आम्ही तुम्हाला अशीच एक जबरदस्त योजनेची माहिती देणार आहोत. या लेखात आम्ही तुम्हाला गुंतवणुकीच्या काही मूलभूत तत्त्वांबद्दल महत्त्वाची माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही कमी कालावधीमध्ये छोटी गुंतवणुक करून मोठा फायदा मिळवू शकता.

लहान वयात गुंतवणूक करा :
योग्य वेळी गुंतवणुक करणे खूप महत्त्वाचे आहे. म्युचुअल फंड गुंतवणूक सल्लागार नेहमी वयाच्या लहानपणापासूनच आपण गुंतवणुकीला सुरुवात करावी असा सल्ला देतात. कारण ते तुम्हाला दीर्घ गुंतवणुकीची संधी तसेच अधिक जोखीम क्षमता देते. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही दीर्घ मुदतीत लाखो नाही तर करोडो रुपयेचा परतावा कमवू शकता.

म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करून तुम्हाला कोणत्या वर्षी परतावा हवा आहे, हे तुम्ही ठरवू शकता. त्यानुसार तुम्ही तुमचे आर्थिक ध्येय बनवून नियमित गुंतवणूक केली पाहिजे. जसे घर खरेदी, लग्न, कार खरेदी, मुलांचे शिक्षण आणि नंतर त्यांचे लग्न अश्या आर्थिक ध्येयासाठी तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक करून तुमची गुंतवणूक कालमर्यादा आणि रक्कम ठरवू शकता.

म्युच्युअल फंडातील एसआयपी योजनेत गुंतवणूक करून तुम्ही करोडपती होऊ शकता. कसे हे आता आपण एका गणनेसह समजून घेऊ. जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी SIP द्वारे गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्ही दर महिन्याला 5000 रुपये बचत करू शकता. म्हणजे दररोज फक्त 167 रुपये आणि SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली, तर निवृत्तीच्या वयाच्या 60 व्या वर्षी तुम्हाला तब्बल 11.33 कोटी रुपये परतावा मिळेल.

उदाहरणार्थ :
* मासिक गुंतवणूक : 5000 रुपये
* अंदाजे परतावा वार्षिक दर : 14 टक्के
* वार्षिक SIP वाढ : 10 टक्के
* एकूण गुंतवणुकीचा कालावधी : 35 वर्षे
* एकूण गुंतवणूक : 1.62 कोटी रुपये
* एकूण परतावा : 9.70 कोटी रुपये
* मॅच्युरिटी एकूण रक्कम :11.33 कोटी रुपये

महत्त्वाच्या गोष्टी :
दरवर्षी जेव्हा तुमचा पगारमध्ये वाढ होते, तेव्हा तुम्ही तुमची गुंतवणुकीची रक्कमही वाढवली पाहिजे. तुम्हाला 35 वर्षांच्या दीर्घ कालावधीत चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा मिळेल आणि त्याचे मोठे फायदे होतील. म्युच्युअल फंड तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी वार्षिक सरासरी 10 ते 16 टक्के वार्षिक परतावा मिळवून देतात. जर तुम्ही दरवर्षी तुमची गुंतवणूक वाढवत राहिलात तर तुम्ही निवृत्तीपूर्वीच करोडपती झालेले असाल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mutual Fund SIP investment for long term benefits on 23 August 2022.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(223)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x