14 May 2025 9:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | तज्ज्ञांकडून ओव्हरवेट रेटिंग जाहीर, हि आहे पुढची अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: BEL HAL Share Price | डिफेन्स शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर, जोरदार खरेदी सुरु, BUY रेटिंग जाहीर - NSE: HAL IREDA Share Price | 49 टक्के रिटर्न मिळेल, पीएसयू शेअर मालामाल करणार, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो या फंडात पैसे गुंतवा, 16 पटीने परतावा मिळतोय, करोडोत रिटर्न मिळेल Mazagon Dock Share Price | रॉकेट तेजीत डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: MAZDOCK Reliance Power Share Price | 43 रुपयाच्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, शॉर्ट टर्ममध्ये मजबूत रिटर्न - NSE: RPOWER Suzlon Share Price | खरेदी करा सुझलॉन स्टॉक, स्वस्तात खरेदीची संधी, मिळेल जरबदस्त परतावा - NSE: SUZLON
x

Stocks To Buy | अल्पावधीत पैसा! हा शेअर अल्पवधीत देईल 40 टक्के परतावा, फायद्याची डिटेल्स जाणून घ्या

Stocks To Buy

Stocks To Buy | आज वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी पाहायला मिळाली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स अडीच टक्क्यांच्या वाढीसह 267 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ब्रोकरेज फर्म नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या तज्ञांच्या मते, वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी तेजी पाहायला मिळू शकते. म्हणून तज्ञांनी स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

वेदांता रिसोर्सेस लिमिटेड कंपनीने आपल्या कर्जाची पुनर्रचना उत्कृष्ट पद्धतीने केली असून कंपनीला 2 वर्षांची वाढीव मुदत मिळाली आहे. याआधी मूडीज फर्मने वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्सचे रेटिंग कमी केले होते. आता मात्र अनेक तज्ञ या स्टॉक बाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. आज गुरूवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी वेदांता लिमिटेड स्टॉक 3.28 टक्के वाढीसह 275.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

भारतातील तसेच जगातील दिग्गज ब्रोकरेज फिएम् माहिती दिली आहे की, वेदांता लिमिटेड कंपनीची मूळ कंपनी असलेल्या वेदांत रिसोर्सेस कंपनीने आपल्या कर्जाची पुनर्रचना उत्कृष्ट पद्धतीने केली. त्यामुळे कंपनीला कर्ज परतफेड करण्यासाठी दोन वर्षांची मिळत मिळाली आहे.

या कालावधीत वेदांता लिमिटेड कंपनी अॅल्युमिनियम आणि झिंक व्यवसायामध्ये अधिक भांडवली गुंतवणुक करू शकते. याशिवाय कंपनी आपल्या पोलाद आणि लोखंडाच्या मालमत्तेचे मुद्रीकरण देखील करू शकते. या सर्व आर्थिक उपायांमुळे वेदांता लिमिटेड कंपनीमध्ये कॅश फ्लो अधिक प्रमाणात वाढेल आणि कंपनीला मोठा फायदा होईल.

वेदांता रिसोर्सेस लिमिटेड कंपनीने केलेच्या कर्ज-पुनर्रचनेमुळे कंपनीचा रोख प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे कंपनीचा मार्जिन सुधारेल. या सर्व सकारात्मक बाबी विचारात घेऊन तज्ञांनी वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर 362 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. ही टारगेट प्राइस शेअर्सच्या सध्याच्या किमतीपेक्षा 40 टक्के अधिक आहे. म्हणून तज्ञांनी वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची रेटिंग HOLD वरून अपग्रेड करून BUY केली आहे.

वेदांत लिमिटेड कंपनी आपल्या पोलाद आणि लोहखनिज व्यवसायाच्या मालमत्तेच्या मुद्रीकरणातून 12100 कोटी रुपये भांडवल उभारण्याची शक्यता आहे. या रकमेचा वापर कंपनी आपले कर्ज फेडण्यासाठी आणि कॅपेक्सवर खर्च करू शकते. सध्या सर्व तज्ञांनी वेदांता लिमिटेड कंपनीच्या बाबतीत विश्वासाने व्यक्त केलेला अंदाज म्हणजे, या कंपनीचा कॅशफ्लो अधिक वाढणार आहे. या सर्व उपायांमुळे वेदांता लिमिटेड कंपनी आपल्या शेअरधारकांना अधिक लाभांश देऊ शकेल. आणि वेदांत रिसोर्सेस लिमिटेड कंपनीच्या कर्जाची परतफेड अधिक होईल.

वेदांता लिमिटेड कंपनी आर्थिक वर्ष 2027 पासून वेदांता रिसोर्सेस लिमिटेड कंपनीपेक्षा जास्त खर्च करण्यास सक्षम असेल. ब्रोकरेज फर्मचा विश्वास आहे की वेदांत लिमिटेड कंपनी आर्थिक वर्ष 2025 आणि आर्थिक वर्ष 2026 मध्ये कंपनी प्रति शेअर 50 रुपये लाभांश वाटप करू शकते. या कंपनीचे अपेक्षित लाभांश उत्पन्न प्रमाण 15 टक्के आहे. वेदांता लिमिटेड कंपनी आर्थिक वर्ष 2023-24 च्या शेवटी 50 रुपये लाभांश देऊ शकते.

वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स आज 274 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 340 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 208 रुपये होती. वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची आतापर्यंतची सर्वकालीन उच्चांक पातळी किंमत 495 रुपये होती. मागील एका महिन्यात वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 12 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy Call on Vedanta Share Price NSE Live 11 January 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या