2 May 2024 3:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell?
x

Multibagger IPO | आयपीओ आला आणि जिंकून गेला, 6 महिन्यांत 120 टक्के परतावा दिला, हा स्टॉक आता खरेदी करावा?

Multibagger IPO

Multibagger IPO | 2022 मधील मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्सचा समावेश झाला आहे. तथापि, मे 2022 मध्ये हा स्टॉक BSE आणि NSE निर्देशांकावर सूचीबद्ध झाला होता. हा मल्टीबॅगर स्टॉक जुलै 2022 च्या मध्यापासून आतापर्यंत अपट्रेंड दिशेने वाढत आहे. आज या स्टॉकने एक नवीन उच्चांक पातळी किंमत गाठली आहे. आज शेअर बाजार खुला झाल्यावर काही वेळातच व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीचे शेअर NSE निर्देशांकावर 774.85 रुपये किमतीवर आणि BSE निर्देशांकावर 774.75 रुपये सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर गेला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअरची किंमत 2.50 टक्के वाढली होती.

व्हीनस पाईप्स शेअरचा इतिहास :
24 मे 2022 रोजी व्हीनस पाईप्स कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE निर्देशांकावर लिस्ट झाले. हा स्टॉक लिस्टींग झाल्यापासून तेजीत ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या स्मॉल-कॅप कंपनीचे शेअर्स 575 रुपये वरून 775 रुपयेवर गेले आहेत. या कालावधीत शेअरच्या किमतीत 35 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तथापि, हा स्टॉक सूचीबद्ध झाल्यापासून 6 महिन्यांच्या कालावधीत 355 रुपये वरून 775 रुपयेवर गेला आहे. या कालावधीत कंपनीच्या भागधारकांनी 120 टक्के नफा कमावला आहे.

मल्टीबॅगर IPO :
Venus Pipes & Tubes Limited कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर IPO स्टॉकपैकी एक मानले जातात. हा स्टॉक 2022 मध्ये सूचीबद्ध झाला होता. या कंपनीच्या IPO चा आकार 165.42 कोटी रुपये होता. IPO मध्ये या स्टॉकची किंमत 310 रुपये ते 326 रुपये दरम्यान निश्चित केली होती. IPO इश्यूमध्ये हा स्टॉक जवळपास सपाट किमतीवर सूचीबद्ध झाला होता. नंतर स्टॉक BSE वर स्टॉक 335 रुपये पर्यंत वाढला होता, तर NSE वर हा स्टॉक 337.50 किमतीपर्यंत वाढला होता. ज्या दिवशी स्टॉक सूचीबद्ध झाला होता, त्यादिवशी हा स्टॉक BSE वर 351.75 रुपये आणि NSE वर 354.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

या स्मॉल-कॅप कंपनीच्या स्टॉकचे सध्याचे बाजार भांडवल 1560 कोटी रुपये आहे. NSE निर्देशांकावर वर या शेअरची ट्रेड व्हॉल्यूम 1.05 लाखांपेक्षा जास्त आहे. या स्टॉकने आज सर्वकालीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. BSE निर्देशांकावर या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 774.75 रुपये आहे, 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 321.10 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger IPO of Venus Pipes and Tubes share price return on investment on IPO Listing 28 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x