
Piccadily Agro Share Price | पिकाडिली अॅग्रो या मद्य बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 309.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे.
मागील सहा महिन्यांत पिकाडिली अॅग्रो कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांचे पैसे साडेचार पट अधिक वाढले आहेत. ज्या लोकांनी सहा महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.61 लाख रुपये झाले आहे. पिकाडिली अॅग्रो या कंपनीच्या व्हिस्कीला जगातील सर्वोत्तम व्हिस्कीचा मान मिळाला होता. आज मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी पिकाडिली अॅग्रो स्टॉक 1.76 टक्के वाढीसह 315 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
पिकाडिली अॅग्रो कंपनीच्या Indri Diwali 2023 Edition ला जगातील सर्वोत्कृष्ट व्हिस्कीचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर या कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढू लागले होते. या कंपनीच्या शेअर्सने सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना एक लाख टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये पैसे लावून संयम राखला, त्यांना एक लाख टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळाला आहे.
11 जुलै 1997 रोजी पिकाडिली अॅग्रो कंपनीचे शेअर्स 25 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. आता या कंपनीचे शेअर्स 315 रुपये किमतीवर पोहचले आहे. 1997 पासून 2024 पर्यंत पिकाडिली अॅग्रो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 123720 टक्के नफा कमावून दिला आहे.
मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 16 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. एका वर्षापूर्वी ज्या गुंतवणूकदारांने या स्टॉकवर 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 6.48 रुपये झाले आहे. पिकाडिली अॅग्रो कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 328 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 38.70 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.