 
						Lawsikho IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी खुशखबर आहे. नुकताच लॉसिखो अॅडिक्टिव लर्निंग टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. लॉसिखो IPO गुंतवणुकीसाठी खुला झाल्यापासुन मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब होत आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचा IPO धुमाकूळ घालत आहे. लॉसिखो कंपनीने आपल्या IPO स्टॉकची किंमत बँड 133 रुपये ते 140 रुपये प्रति निश्चित केली आहे.
लॉसिखो आयपीओ जीएमपी :
लॉसिखो या SME कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 100 रुपयेपेक्षा जास्त वाढीसह ट्रेड करत आहे. सध्या या शेअरची ग्रे मार्केट प्रीमियम किंमत 109 रुपयेवर पोहचली आहे. स्टॉक लिस्टिंग होईपर्यंत हा IPO याच GMP किमतीवर टिकला तर गुंतवणुकदारांना लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 77.86 टक्के नफा मिळू शकतो.
लॉसिखो कंपनीचा आयपीओ 19 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. कंपनीने आपल्या एका IPO लॉटमध्ये 1000 शेअर्स ठेवले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 1,40,000 रुपये जमा करावे लागतील.
IPO तपशील :
लॉसिखो या कंपनीच्या प्रवर्तक गटात रामानुज मुखर्जी आणि अभ्युदय सुनील अग्रवाल सामील आहेत. आयपीओपूर्वी कंपनीमध्ये प्रवर्तकांचा वाटा 92.27 टक्के होता. मात्र IPO नंतर याचा वाचा 67.27 टक्केवर येईल. लॉसिखो कंपनीने अँकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 16.69 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे.
24 जानेवारी 2024 रोजी गुंतवणुकदारांना शेअर्स वाटप केले जातील. 29 जानेवारी रोजी IPO स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल. लॉसिखो कंपनीच्या IPO चा आकार 60.16 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या IPO मध्ये 41.37 लाख शेअर्स फ्रेश शेअर्स आणि 1.6 लाख शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकले जाणार आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		