14 May 2024 12:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर्स तेजीत, नवीन अहवाल प्रसिद्ध, पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Adani Enterprises Share Price

Adani Enterprises Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी निर्माण झाली होती. अमेरिकास्थित जागतिक वित्तीय सेवा कंपनी कँटर फिट्झगेराल्डने अदानी समुहाबाबत एक अहवाल प्रसिद्ध केल्याने, अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी निर्माण झाली होती.

कँटर फिट्झगेराल्डने अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअरबद्दल काही सकारात्मक बाबी आपल्या अहवालात नमूद केल्या आहे. या अहवालातील माहितीनुसार अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स पुढील काळात आपल्या गुंतवणूकदारांना 51 टक्के नफा कमावून देऊ शकतात. आज मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 1.02 टक्के वाढीसह 3,096 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.

कँटर फिट्झगेराल्डच्या मते, अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स पुढील काळात 4,368 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज हा स्टॉक 3096 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. 27 जानेवारी 2023 रोजी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 3,342.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. हिंडेनबर्ग फर्मच्या वादग्रस्त अहवालामुळे अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळले आणि 3 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 1017 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर आले होते.

अमेरिका स्थित ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या कामगिरीवर आम्हाला विश्वास आहे. भारतात ऊर्जा संसाधने निर्माण करणारी अदानी एंटरप्रायझेस ही सर्वात विश्वासार्ह कंपनी म्हणून नावारूपाला आली आहे.

कँटर फिट्झगेराल्डच्या अहवालात अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या 8 विमानतळांचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. यातून 25 टक्के प्रवासी हवाई वाहतूक आणि 33 टक्के मालवाहतूक केली जाते. अदानी एंटरप्रायझेस कंपनी भारतात अनेक डेटा सेंटर्सची उभारणी करत आहे. आणि 5,000 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते बांधण्याचे कंत्राट कंपनीला मिळाले आहे.

भारताच्या अक्षय ऊर्जा महत्त्वाकांक्षेसाठी सौर आणि पवन ऊर्जा निर्मिती उपकरणांचा अविभाज्य निर्माता म्हणून अदानी एंटरप्रायझेस कंपनी नावारूपाला आली आहे. या कंपनीचे फोकस आता विमानतळ, रस्ते आणि त्याची अक्षय ऊर्जा प्रणाली या क्षेत्रावर आहे. कँटर फिट्झगेराल्डने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे उर्वरित व्यवसाय समुहाच्या एकूण महसुल संकलनात 85 टक्क्यांपेक्षा जास्त भर घालतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Enterprises Share Price NSE Live 30 January 2024.

हॅशटॅग्स

#Adani Enterprises Share Price(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x