
Adani Gas Share Price | मागील आठवड्यातील शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात मजबूत तेजी असताना अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. आज अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आले आहेत.
या कंपनीचे शेअर्स आता 1000 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आज सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी अदानी टोटल गॅस स्टॉक 0.43 टक्के वाढीसह 1,003.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
व्हेंचुरा सिक्युरिटीज फर्मने अदानी टोटल गॅस कंपनीच्या स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1,340 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 999 रुपये किमतीवर ओपन झाले होते. आणि दिवसभरात हा स्टॉक 1014.25 रुपये किमतीवर पोहचला होता. मात्र नंतर त्यात घसरण झाली, आणि शेअर लाल निशाणीवर बंद झाला.
व्हेंचुरा सिक्युरिटीज सारख्या दिग्गज फर्मने अदानी ग्रुपच्या काही शेअर्सचे कव्हरेज पुन्हा सुरू केले आहे. अदानी टोटल गॅस कंपनीसाठी, व्हेंचुरा सिक्युरिटीज फर्मने अंदाज व्यक्त केला आहे की, आर्थिक वर्ष 2023-26 या काळात कंपनीचा महसूल 25.3 टक्के, EBITDA 39.9 टक्के आणि PAT 42.6 टक्के सरासरी वार्षिक दराने वाढले. कंपनीचा एबिटा मार्जिन 780 अंकांनी वाढून 27.7 टक्के वाढण्याची शक्यता आहे. तर प्रॉफिट मार्जिन देखील 570 अंकाच्या वाढीसह 17.8 टक्के वाढण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या मते, अदानी टोटल गॅस कंपनीचा ROE प्रमाण 26.1 टक्के आणि ROIC प्रमाण 31 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत अदानी टोटल गॅस कंपनीने निव्वळ नफ्यात तब्बल 16 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. सीएनजी गॅसच्या विक्रीत अधिक वाढ झाल्यामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ पाहायला मिळाली आहे.
डिसेंबर 2023 तिमाहीत अदानी टोटल गॅस कंपनीने सीएनजी गॅसच्या विक्रीमध्ये 24 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. या काळात कंपनीने 144 दशलक्ष युनिट घनमीटर सीएनजी गॅस, आणि 80 दशलक्ष पीएनजी गॅसची विक्री केली आहे. अदानी टोटल गॅस ही कंपनी अदानी ग्रुप आणि फ्रान्समधील टोटल एनर्जी कंपनीने स्थापन केलेला संयुक्त उपक्रम आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.