7 May 2025 5:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

मनसेकडून ठाण्यात ‘सीड बॉम्बचे’ वाटप

Abhijeet Panase, Avinash Jadhav, MNS, Thane MNS, Raj Thackeray, Amit Thackeray, Seed Bomb, Drought Situation

ठाणे : राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना बॉंब वाटप करणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सांगितल्याप्रमाणे ठाण्यात बॉंब’चे वाटप केले. तत्पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणते बॉंब वाटप करणार याची उत्सुकता सर्वांना होती आणि अखेर महाराष्ट्र निर्माण सेनेकडून ठाण्यात सीड बॉम्बचे वाटप करण्यात केले.

देशाची आजची परिस्थिती बघता मनसेचे बॉम्बवाटप’ असे शीर्षक असलेले बॅनर मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी प्रसिद्ध केले होते. दरम्यान, मनसे बॉम्बवाटप करणार आहे. म्हणजे नेमका कुठला राजकीज धमाका करणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आणि प्रसार माध्यमांमध्ये देखील निर्माण झाली होती. बॉम्ब वाटपाच्या या फेसबुक पोस्टनंतर अभिजीत पानसेंनी प्रतिक्रियाही दिली होती.’हो आम्ही बॉम्ब वाटणार आहोत. लवकरच तारीख जाहीर करू, तेव्हा प्रत्यक्षच या’, असं ते म्हणाले होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यात बॉम्ब वाटप करणार असल्याचा गाजावाजा केला, त्यामुळे मनसेचा बॉम्ब नेमका कुठला आणि लोकांच्या जमिनीवरील वास्तवाशी संबंधित विषयांवरून आंदोलन करणारा पक्ष अचानक बॉम्ब वाटप करणार हे सामान्यांना न समजण्यापलीकडील होते. त्यामुळे या विषयाला अनुसरून लोकांनी उत्सुकता बाळगली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना बॉम्ब वाटप करणार असल्याने पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्तही लावला होता. इतकेच नव्हे तर कोण आला रे कोण आला मनसेचा बॉम आला अशा घोषणाही देखील उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या. अखेर काल संध्याकाळी मनसेचा बॉम्ब फुटला.

मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी मनसेच्या नौपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयात ठाणेकरांना सीड बॉम्बचे वाटप केले. तर राज्यातील आणि देशातील दुष्काळाची परिस्थिती पाहता आता पावसाळ्याच्या दिवसात सीड बॉम्ब झाड लावण्यासाठी असलेले ‘बी’चे वाटप केले असल्याचे पानसे यांनी म्हंटले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या