19 May 2024 9:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Reliance Power Share Price | 28 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, अल्पावधीत दिला 2315% परतावा

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू आहे. अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवर या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 27.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 99 टक्क्यांनी खाली घसरले होते.

मागील काही वर्षांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 1 रुपयेवरून वाढून 27 रुपये किमतीवर पोहचली आहे. आज गुरूवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 3.11 टक्के वाढीसह 28.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 99 टक्के घसरल्यानंतर नीचांक किंमत स्पर्श करून 2300 टक्के वाढले आहेत. 16 मे 2008 रोजी या कंपनीचे शेअर्स 260.78 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 27 मार्च 2020 रोजी पर्यंत या कंपनीच्या शेअर्सने 1.13 रुपये ही नीचांक किंमत स्पर्श केली होती. त्यांनतर हा स्टॉक पुन्हा तेजीत आला.

मागील 4 वर्षांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2315 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 775 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. मागील एका वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 133 टक्के वाढली आहे. 8 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 11.69 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 7 फेब्रुवारी 2024 रोजी हा स्टॉक 27.30 रुपये किमतीवर पोहचला होता.

मागील एका वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 133 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 53 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवले आहेत. या काळात शेअर्सची किंमत 17.79 रुपयेवरून वाढून 27.30 रुपये किमतीवर पोहोचली आहे. रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 33.10 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.05 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 08 February 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x