Trent Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ट्रेंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 2 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 27 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. डिसेंबर तिमाहीत ट्रेंट कंपनीने 370.6 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
या कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 59000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमाणी यांनी देखील ट्रेंट कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी ट्रेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.34 टक्के घसरणीसह 3,752 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
8 फेब्रुवारी 2002 रोजी ट्रेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.36 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 9 फेब्रुवारी 2024 रोजी ट्रेंट कंपनीचे शेअर्स 3855.15 रुपये किमतीवर पोहोचले होते. ज्या लोकांनी 2002 मध्ये ट्रेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 59645 टक्के वाढले आहे. मागील 5 वर्षांत ट्रेंट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1035 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमवून दिला आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स 333.75 रुपयेवरून वाढून 3855.15 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.
ट्रेंट कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3935.85 रुपये होती. तर नीचांकी किंमत पातळी 1250.95 रुपये होती. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांच्या पोर्टफोलिओमध्ये ट्रेंट कंपनीचे 54 लाखांपेक्षा जास्त शेअर्स आहे. दमानी यांनी ट्रेंट लिमिटेड कंपनीचे 1.52 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. राधाकिशन दमानी यांनी आपल्या डेरिव्ह ट्रेडिंग अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत ट्रेंट कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहे.
मागील एका वर्षात ट्रेंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 185 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. याकाळात ट्रेंट कंपनीचे शेअर्स 1342.45 रुपयेवरून वाढून 3855.15 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील 6 महिन्यांत ट्रेंट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 115 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.