18 May 2024 11:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये घसरण, स्वस्तात खरेदी करा, तज्ज्ञांनी जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस

IRFC Share Price

IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच आयआरएफसी या सरकारी कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना अफाट नफा कमावून दिला आहे. जानेवारी 2024 मध्ये आयआरएफसी कंपनीच्या शेअरने 190 रुपये किंमत स्पर्श केली होती.

मात्र मागील काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेअर आता 140 रुपये किमतीवर पोहचला आहे. नुकताच या कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 9.27 टक्के घसरणीसह 139.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 153.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 23 जानेवारी 2024 रोजी आयआरएफसी कंपनीच्या शेअरने 192.80 रुपये ही सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तर 28 मार्च 2023 रोजी या कंपनीच्या शेअरने 25.45 रुपये ही नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. याकाळात कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सनी तिमाही आधारावर ऑपरेशनल महसुल संकलनात किंचित वाढ नोंदवली आहे. कंपनीने तिमाही निकाल जाहीर करण्यापूर्वीच शेअरमध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाला होता. मात्र या शेअरमध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळू शकते. तज्ञांच्या मते, अल्पावधीत आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 180 ते 200 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतील आयआरएफसी कंपनीच्या निकालांवर बोलताना स्टॉकबॉक्स फर्मच्या तज्ञांनी माहिती दिली की, “भारतीय रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या महसुलात वर्ष-दर-वर्ष आधारावर वाढ पाहायला मिळाली आहे. मात्र तिमाही-दर-तिमाही आधारावर कंपनीच्या महसूल संकलनात घसरण पाहायला मिळाली आहे. भारत सरकारचे मुख्य उद्दिष्ट रेल्वे क्षेत्रातील विकासाला चालना देण्याचे आहे. त्यामुळे पुढील काळात या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढ पाहायला मिळू शकते”.

आयआरएफसी कंपनीची कर्ज पातळी चांगली व्यवस्थापित असून कंपनीचे कर्ज इक्विटी प्रमाण 8.54 टक्के आहे. या कंपनीच्या शेअर्सचा EPS मागील तिमाहीत 1.20 टक्के होता, जो डिसेंबर तिमाहीत 1.23 टक्के नोंदवला गेला आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करताना 120 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावावा.

चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरएफसी स्टॉकमध्ये 180 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे. जर या कंपनीचे शेअर्स 180 रुपये किमतीच्या पार गेले तर, अल्पावधीत हा स्टॉक 200 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. त्यामुळे तज्ञांनी 120 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 12 February 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x