14 May 2024 12:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mobile Recharge Hike | बापरे! कोट्यवधी मोबाइल युजर्सना झटका लागणार! मोबाईल रिचार्ज खर्च 25% वाढणार Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, या 5 राशींसाठी पुढचे 17 दिवस अत्यंत लाभदायक, तुमची राशी कोणती? Mutual Fund SIP | पगारदारांची पसंती 'या' स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांना, नोकरदार वर्ग मालामाल होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! जुलैपासून बदलणार DA ची रक्कम, किमान वेतनात वाढ होणार RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

Yes Bank Share Price | 27 रुपयांचा येस बँक शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, पण टेक्निकल चार्टनुसार पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | मागील काही ट्रेडिंग सेशनपासून येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या बँकेच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक स्टॉक मजबूत घसरला होता.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 10.71 टक्क्यांच्या घसरणीसह 28.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 9 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 32.81 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक आता 14.63 टक्क्यांनी घसरला आहे. आज बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.54 टक्के घसरणीसह 27.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सेबीने येस बँकेच्या शेअर्सला अल्पकालीन ASM फ्रेमवर्क अंतर्गत ठेवले आहे. जेव्हा एखाद्या स्टॉकमध्ये तेजी-मंदी आणि अस्थिरता अनपेक्षितपणे वाढत असते, तेव्हा गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी सेबी ते शेअर्स एएसएम फ्रेमवर्क अंतर्गत सामील करते. येस बँकेच्या शेअर्समधील उच्च जोखमबद्दल गुंतवणूकदारांना सावध करण्यासाठी, सेबीने या बँकिग शेअर्सला एएसएम फ्रेमवर्कमध्ये ठेवले आहे.

मागील काही आठवड्यांत येस बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. मात्र आता शेअरमध्ये प्रॉफिट बुकींग होण्याची शक्यता आहे. टेक्निकल चार्टवर येस बँकेच्या शेअर्समध्ये 32.7 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी सध्या येस बँक स्टॉकमध्ये प्रॉफिट बुक केला पाहिजे. जर हा स्टॉक 28 रुपये किमतीच्या खाली गेला, तर पुढील काळात शेअर 24 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. ब्रोकरेज फर्म आनंद राठीच्या तज्ञांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, येस बँकेच्या शेअरने मागील दोन आठवड्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

सध्या हा बँकिंग स्टॉक ओव्हरबॉट झोन ट्रेड करत आहे. त्यामुळे, शेअरमध्ये किंचित नफा बुक होण्याची शक्यता आहे. तज्ञांनी येस बँक स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 26 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. प्रभुदास लीलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, जर येस बँक स्टॉकने 32 रुपये किंमत स्पर्श केली तर, हा स्टॉक पुढील काळात 35 रुपये ते 41 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 14 February 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x