
Canara Bank Share Price | शेअर बाजारातील कंपनीन्या आपल्या शेअर्सची तरलता वाढावी यासाठी शेअर्स विभाजित करत असतात. त्यामुळे कंपन्यांचे शेअर्स स्वस्त होतात. आणि गुंतवणुकदारांना शेअर्स परवडणाऱ्या किमतीवर उपलब्ध होतात.
शेअर बाजारात सूचीबद्ध असलेली कॅनरा बँक आपले शेअर्स विभाजित करण्याची शक्यता आहे. बँकेने सेबीला दिलेल्या माहितीनुसार 26 फेब्रुवारी 2024 रोजी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कॅनरा बँकेचे संचालक स्टॉक स्प्लिटचा निर्णय घेऊ शकतात.
कॅनरा बँकेने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, बँकेचे संचालक, बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी बँक सिक्युरीटी आणि शेअर्सची ट्रेडिंग विंडो 7 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी बंद असेल. ज्या दिवशी संचालक मंडळाची बैठक संपेल त्यादिवशी ही ट्रेडिंग विंडो ओपन केली जाईल. अशा स्थितीत सोमवारी स्टॉक विभाजनाबाबत संचालक काय निर्णय घेणार याकडे सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
कोविड महामारीनंतर कॅनरा बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. मागील चार वर्षांत कॅनरा बँकेच्या शेअर्सची किंमत 80 रुपयेवरून वाढून 580 रुपये किमतीवर गेलो होती. या काळात कॅनरा बँकेंच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 625 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवारी हा शेअर 1.17% घसरून 573.65 रुपयांवर ट्रेड करत होता.
मागील एक वर्षात या बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. मागील एका वर्षात कॅनरा बँकेच्या शेअर्सची किंमत 115 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. मागील 6 महिन्यांत कॅनरा बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 75 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.