
Infibeam Share Price | इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीने नुकताच एका अमेरिकन AI कंपनीचे 20 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. या बातमीमुळे सोमवारी इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 37.90 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे.
इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी अमेरिकन कंपनी XDuce मधील 20 टक्के भाग भांडवल 10 मिलियन डॉलर्समध्ये खरेदी केले आहे. आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी इन्फ़ीबीम एवेन्यू स्टॉक 1.50 टक्के घसरणीसह 36.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
XDuce या अमेरिकन कंपनीचे मुख्यालय न्यूजर्सीमध्ये आहे. या कंपनीकडे सध्या 150 पेक्षा जास्त डेव्हलपर काम करत आहेत. उत्तर अमेरिकेतील अनेक विमा कंपन्या Xduce कंपनीचे ग्राहक आहेत.
इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक विश्वास पटेल यांनी एका निवेदनात माहिती दिली की, “मागील वर्षी इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीचे आंतरराष्ट्रीय व्यवसायांमधील उत्पन्न आपल्या एकूण उत्पन्नात 10 टक्क्यांपेक्षा कमी नोंदवले गेले होते. इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीला आंतरराष्ट्रीय स्तरावर हे उत्पन्न प्रमाण 30 टक्केवर घेऊन जायचे आहे. अशा परिस्थितीत XDuce कंपनीमध्ये गुंतवणूक करणे खूप फायद्याचे ठरणार आहे”.
सप्टेंबर 2023 पासून इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीच्या शेअर्समध्ये भरघोस वाढ पाहायला मिळत आहे. याकाळात शेअर्सची किंमत 14.60 रुपयेवरून वाढून 37.90 रुपये किमतीवर पोहोचली आहे. म्हणजेच सप्टेंबर पासून आतापर्यंत इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 154 टक्के नफा कमावून दिला आहे.
चालू आर्थिक वर्षात डिसेंबर तिमाहीत या कंपनीने मजबूत कामगिरी केली आहे. या कालावधीत कंपनीचा PAT 42.10 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या PAT मध्ये 64 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. डिसेंबर तिमाहीत इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीचा EBITDA 69 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.