14 June 2024 12:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 14 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 14 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NBCC Share Price | सरकारी शेअरने अल्पावधीत दिला 900% परतावा, ऑर्डरबुक मजबूत, पुढेही मल्टिबॅगर Reliance Power Share Price | शेअर प्राईस 30 रुपये! 5 दिवसात दिला 34% परतावा, गुंतवणुकीची संधी सोडू नका RVNL Share Price | RVNL स्टॉक देणार ब्रेकआऊट, PSU शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉकबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक 'BUY' करावा की 'Sell'? Reliance Infra Share Price | स्टॉक रॉकेट स्पीडमध्ये परतावा देणार, 5 दिवसात दिला 30% परतावा, खरेदीला गर्दी
x

Vaibhav Jewellers IPO | आला रे आला IPO आला! वैभव ज्वेलर्स IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, शेअर प्राईस बँडसह तपशील जाणून घ्या

Vaibhav Jewellers IPO

Vaibhav Jewellers IPO | वैभव ज्वेलर्स कंपनीने आपला IPO लाँच करण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने आपल्या शेअरची प्राइस बँड देखील जाहीर केली आहे. वैभव ज्वेलर्स कंपनीने आपल्या IPO साठी शेअरची किंमत बँड 204-215 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे.

वैभव ज्वेलर्स कंपनीचा IPO 22 सप्टेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. तुम्ही या IPO मध्ये 26 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकता. वैभव ज्वेलर्स ही कंपनी दक्षिण भारतात आघाडीची ज्वेलरी ब्रँड कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. वैभव ज्वेलर्स कंपनी आपल्या IPO इश्यूद्वारे 270 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रयत्न करणार आहे.

वैभव ज्वेलर्स कंपनी आपल्या IPO च्या मध्मामातून 210 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स जारी करेल आणि 28 लाख इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहे. वैभव ज्वेलर्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 204-215 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे. यासोबतच कंपनीने एका लॉटमध्ये 69 शेअर्स ठेवले आहेत.

गुंतवणूकदारांना वैभव ज्वेलर्स कंपनीच्या IPO मध्ये एक लॉट खरेदी करण्यासाठी फक्त 14,835 रुपये जमा करावे लागणार आहे. किरकोळ गुंतवणूकदार एकावेळी कमाल 13 लॉट खरेदी करू शकतात. वैभव ज्वेलर्स कंपनीने आपल्या IPO मध्ये 50 टक्के कोटा क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी राखीव ठेवला आहे. आणि 15 टक्के शेअर्स एनआयआयसाठी राखीव ठेवले आहेत. या कंपनीने किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के कोटा राखीव ठेवला आहे.

वैभव ज्वेलर्स कंपनीचा IPO 22-26 सप्टेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. कंपनी शेअर्सचे वाटप 3 ऑक्टोबर 2023 रोजी पूर्ण करेल. वैभव ज्वेलर्स कंपनीचे IPO शेअर्स 5 ऑक्टोबर 2023 पर्यंत गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा होतील. आणि कंपनीचे शेअर्स 6 ऑक्टोबर 2023 पर्यंत शेअर बाजारात सूचीबद्ध होतील.

वैभव ज्वेलर्स ही कंपनी आंध्र प्रदेश राज्यात दागिन्यांचा व्यवसाय करणारी कंपनी आहे. हा कंपनीचे 77 टक्के शोरूम टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये चालू आहेत. आणि उर्वरित किरकोळ शोरूम हैदराबाद आणि विशाखापट्टणम या सारख्या मोठ्या शहरात चालू आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vaibhav Jewellers IPO for investment on 18 September 2023.

हॅशटॅग्स

#Vaibhav Jewellers IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x