26 November 2022 8:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Mutual Fund | टाटा म्युच्युअल फंडमधील टॉप 10 स्किमची लिस्ट सेव्ह करा, 3 वर्षात पैसे दुप्पट करा आणि मालामाल व्हा Horoscope Today | 27 नोव्हेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 27 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Bhediya Box Office Collection | बॉक्स ऑफिसवर 'भेडिया'ची दमदार ओपनिंग, 1 दिवसात किती कोटींचा गल्ला? Paytm Share Price | खरं की काय? पेटीएमचा स्टॉक पुन्हा दुपटीने वाढणार? तज्ज्ञ असं सांगत असण्यामागे नेमकं कारण काय? Vikram Gokhale | मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसंच नाट्यसृष्टीतही अढळपद निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच निधन Mutual Fund Calculator | बँक FD चिल्लर झाली, SIP गुंतवणुकीतून 2 कोटी रिटर्न मिळेल, हा पैशाचा फंडा फॉलो करा
x

IRCTC Ticket Booking | आयआरसीटीसीकडून रेल्वे प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी नवी सुविधा, तुम्ही सहजपणे तिकीट बुक करू शकता

IRCTC Ticket Booking

IRCTC Ticket Booking | रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. तुम्हीही रेल्वेत रिझर्व्हेशन केलंत तर आता आणखी सोप्या पद्धतीने तुम्ही स्वत:साठी सीट बुक करू शकता. आता तुम्हाला आयआरसीटीसी ॲपवर जाऊन तिकीट बुक करण्याची गरज नाही, तुम्ही ॲपवर लॉग इन न करता तुमचं तिकीट बुक करू शकता. कसे ते समजून घेऊया.

IRCTC ॲपशिवाय बुक करता येणार तिकीट :
आयआरसीटीसीकडून प्रवाशांना अनेक विशेष सुविधा पुरवल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशा एका सुविधेबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही आयआरसीटीसी चॅटबॉटमधूनच रिझर्व्हेशन करू शकता. रेल्वेतर्फे ग्राहकांसाठी विशेष सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा नुकतीच सुरू करण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत तुम्ही सहजपणे तिकीट बुक करू शकता.

दररोज १० लाख लोक तिकीट बुक करतात :
आयआरसीटीसीच्या वेबसाइटनुसार, सध्या वेबसाइटवरून दररोज 10 लाखांहून अधिक लोक आरक्षण करतात. याशिवाय ॲप आणि स्टेशनच्या माध्यमातूनही प्रवासी तिकीट बुक करतात आणि अनेक वेळा वेबसाइट व्यवस्थित चालत नसेल तर लोकांना वेळेत तिकीट मिळत नाही, हे लक्षात घेऊन रेल्वेने चॅटबॉटची सुविधा सुरू केली आहे.

वेगळा चार्ज द्यावा लागणार नाही :
या सुविधेत तुम्हाला कोणतेही वेगळे शुल्क द्यावे लागणार नाही, जितके पैसे तुम्हाला वेबसाइटवर तिकीट बुकिंगसाठी मोजावे लागतील, तेवढेच शुल्क चॅटबॉटवर द्यावे लागेल.

किती शुल्क आकारते :
तिकीट बुक करताना स्लीपर क्लाससाठी 10 रुपये आणि एसी क्लाससाठी 15 रुपये खर्च करावे लागतील. त्याचबरोबर यूपीआयने पैसे भरल्यास स्लीपर क्लाससाठी २० रुपये आणि एसी क्लाससाठी ३० रुपये मोजावे लागतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: IRCTC Ticket Booking facility of chatbot get many offers check details 17 September 2022.

हॅशटॅग्स

#IRCTC Ticket Booking(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x