
RITES Share Price | राइट्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच IIT भुवनेश्वरने राइट्स लिमिटेड कंपनीला मोठी जबाबदारी दिली आहे. याबातमीमुळे राइट्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
IIT भुवनेश्वरने राइट्स लिमिटेड कंपनीला स्थायी कॅम्पसची उभारणी करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी राइट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.38 टक्के वाढीसह 796.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नवीन काम मिळाल्याच्या बातमीमुळे राइट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.85 टक्क्यांच्या वाढीसह 796.45 रुपये किमतीवर पोहोचले होते. राइट्स लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीला IIT भुवनेश्वरने औपचारिक LOI जारी केले आहे. IIT भुवनेश्वरच्या नवीन कॅम्पस उभारणीचे एकूण मूल्य 414 कोटी रुपये आहे.
राइट्स लिमिटेड कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत मजबूत कामगिरी केली आहे. राइट्स लिमिटेड कंपनीला 612 कोटी रुपये मुक्ताच्या 100 पेक्षा जास्त ऑर्डर मिळाल्या आहेत. मागील 6 महिन्यांत राइट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 65 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत निफ्टी-50 निर्देशांक फक्त 14 टक्के वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.