
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. नुकताच ब्रोकरेज CLSA ने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरची रेटिंग ‘बाय’ वरून अपग्रेड करून ‘आउटपरफॉर्म’ केली आहे. सीएलएसए फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स पुढील काही दिवसात 11 टक्के वाढू शकतात. ( टाटा मोटर्स कंपनी अंश)
29 फेब्रुवारी रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 1.5 टक्क्यांच्या घसरणीसह 943.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 2.93 टक्के वाढीसह 978 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 978 रुपये आहे. तर नीचांक किंमत पातळी 400.40 रुपये होती. या कंपनीचे शेअर्स तेजीच्या काळात अपट्रेण्डमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह 1,053.50 रुपये रुपये किमतीवर जाऊ शकतात. तर डाऊन ट्रेण्डमध्ये 10 टक्क्यांच्या घसरणीसह 862 रुपये किमतीवर जाऊ शकतात.
मागील एका महिन्यात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये 18 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समधील संभाव्य वाढीच्या पार्श्वभूमीवर अनेक ब्रोकरेज फर्म जबरदस्त उत्साही पाहायला मिळत आहेत. म्हणून तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर 1,061 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या जग्वार अँड लँड रोव्हर कंपनीच्या मजबूत कामगिरीमुळे CLSA ने टाटा मोटर्स कंपनीच्या कामगिरी बाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. JLR ही कंपनी टाटा मोटर्स कंपनीची एक शाखा आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.