 
						Tube Investment Share Price | ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. पाच वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 400 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक 4000 रुपये किमतीच्या पार गेला होता. ( ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया कंपनी अंश )
8 मार्च 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 380.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर 2 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3720 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मंगळवार दिनांक 5 मार्च 2024 रोजी ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स 2.69 टक्के घसरणीसह 3,555 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मागील 6 महिन्यांत ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 21 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 876 टक्के वाढली आहे. मार्च 2019 ते मार्च 2020 दरम्यान या कंपनीचे शेअर्स 400-500 रुपये दरम्यान ट्रेड करत होते.
फेब्रुवारी 2021 मध्ये ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया कंपनीच्या शेअर्सने पहिल्यांदा 1000 रुपये किंमत स्पर्श केली होती. त्यानंतर जुलै 2022 मध्ये या कंपनीचे शेअर्स 2000 रुपये किमतीवर पोहचले होते. डिसेंबर 2022 पर्यंत ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स 3000 रुपये किमतीवर पोहचले होते.
जानेवारी 2024 मध्ये ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया कंपनीचे शेअर 4000 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4125 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2422 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		