
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. सिग्नोरिया क्रिएशन कंपनीचा आयपीओ लवकरच गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. सिग्नोरिया क्रिएशन कंपनीने आपल्या आयपीओमध्ये शेअर्सची किंमत बँड 61 रुपये ते 65 रुपये निश्चित केली आहे. या शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. हा IPO 12 मार्च ते 14 मार्च दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. या कंपनीने आपल्या IPO लॉटमध्ये 2,000 शेअर्स ठेवले आहे. ( सिग्नोरिया क्रिएशन कंपनी अंश )
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, सिग्नोरिया क्रिएशन कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 50 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. जर हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 50 रुपये किमतीवर टिकला आणि गुंतवणुकदारांना स्टॉक अप्पर प्राइस बँडवर वाटप करण्यात आला तर शेअर 115 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच पहिल्या दिवशी गुंतवणुकदारांना 76.92 टक्के परतावा मिळू शकतो.
सिग्नोरिया क्रिएशन या कंपनीची सूचीबद्ध पीअर कंपनी नंदानी क्रिएशन्स लिमिटेड आहे. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात सिग्नोरिया क्रिएशन कंपनीच्या महसुल संकलनात 62.13 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. तर कंपनीचा PAT 242.14 टक्के वाढला होता. सिग्नोरिया क्रिएशन कंपनीच्या IPO चा आकार 9.28 कोटी रुपये आहे. या IPO मध्ये पूर्णपणे फ्रेश शेअर्स विकले जाणार आहेत. यात ऑफर फॉर सेलचा समावेश नाही.
सिग्नोरिया क्रिएशन ही कंपनी मुख्यतः महिलांचे कपडे, दुपट्टे, कुर्ती, पायघोळ, टॉप आणि को-ऑर्डर सेटसह महिलांच्या विविध पोशाखांची निर्मिती आणि विक्री करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी आपल्या क्लासिक कुर्त्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे कुर्ते वेगवेगळ्या रंग, नमुने आणि आकारात विकले जातात. 30 जून 2023 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत सिग्नोरिया क्रिएशन कंपनीने आपल्या उत्पादन श्रेणीमध्ये महिलांसाठी को-ऑर्डर सेट देखील लाँच केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.