28 March 2024 8:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

अनेक देश चीनमधून मॅन्युफॅक्चरिंग प्लांट इतरत्र हलवण्याच्या विचारात; भारताला मोठी संधी

Covid 19, Corona Crisis, China FDI

वॉशिंग्टन, २० एप्रिल: आंतरराष्ट्रीय नाणे निधी म्हणजेच आयएमएफ आणि जागतिक बँकेने व्यापार सुरू ठेवण्याचं आवाहन सर्व सदस्य राष्ट्रांना केलं आहे. करोनाशी लढा देताना व्यापार सुरू ठेवणंही आवश्यक असल्याचं या दोन संस्थांनी म्हटलं आहे. वैद्यकीय पुरवठा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवल्याचे विपरित परिणाम समोर येतील, असाही इशारा आयएमएफ आणि जागतिक बँकेने दिला आहे.

दुसरीकडे चीनमधील मृतांची संख्या अमेरिकेपेक्षाही जास्तच आहे. कोविड १९ साथीत त्यांच्याकडे खूप बळी गेले आहेत पण ते खरा आकडा सांगत नाहीत, असा आरोप करून ट्रम्प म्हणाले की, कोविड १९ म्हणजे करोना मृतांच्या संख्येत अमेरिका नव्हे तर चीन पहिल्या क्रमांकावर आहे. जर ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, स्पेन, इटली या प्रगत देशात मृतांचा दर जास्त असेल तर तो चीनमध्ये कमी असणे शक्यच नाही असं म्हटलं आहे. मात्र जगभरातील देश सध्या चीनपासून दोन हात लांब राहण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे.

चीनच्या पीपल्स बँक ऑफ चायनाने काही दिवसांपूर्वी एचडीएफसी या देशातील सर्वात मोठ्या गृहवित्त बँकेत म्हणजे एचडीएफसीत आपले भागभांडवल वाढवले. त्यानंतर भारताने चीनच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गुंतवणुकीविरोधातही फास आवळल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. संधिसाधू गुंतवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात रोकड तरलतेचा अभाव असल्याने आर्थिक संकट आहे. याचा फायदा घेऊन चीनने अनेक उद्योगांमध्ये आपले पाय पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, कोरोनोत्तर काळात चीनमधून अनेक विशेषत: मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आपला गाशा गुंडाळतील अशी शक्यता आता जगभर बोलून दाखवली जाते आहे. जपान सरकारने तर घसघशीत रकमेची तरतूद करत आपल्या कंपन्यांना आर्थिक हात दिला आणि चीनमधून बाहेर पडण्यास सांगितलं आहे. जपानमध्ये परत या नाही, तर अन्य आशिया-पॅसिफिक देशांत गुंतवणूक करता येतेय का पाहा, असा सल्लाही जपाननं दिला आहे. आता अमेरिकन कंपन्यांही आपले मॅन्युफॅक्चरिंगचे काम चीनमधून हलवतील आणि तशाच तुलनेनं स्वस्त मनुष्यबळ व कच्चा मालासह अन्य सेवांसाठी भारतात येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. साधारण २०० कंपन्या भारतात आपले तळ उभारण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. भारतात अधिक पारदर्शक कारभार असून, नवी दिल्लीने आर्थिक सुधारणांना वेग दिला आहे. भारतानं काही बदल स्वीकारले तर या कंपन्या भारतात येतील आणि त्याचा भारताला मोठा फायदा होऊ शकेल.

 

News English Summary: In the post-Coronation period, it has been widely reported that a number of manufacturing companies, especially from China, will be carrying their bracelets. The Japanese government has provided financial support to its companies, and has asked them to leave China, while providing a declining amount. Japan has advised not to return to Japan, but to see if you can invest in other Asia-Pacific countries.

News English Title: Story many countries may exit from China after Covid 19 Corona Crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x