
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. मागील एका महिन्यापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये सतत घसरण पहायला मिळत होती. मात्र गुरुवारच्या अप्पर सर्किटने गुंतवणुकदारांना किंचित दिलासा दिला आहे. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 4.30 टक्के वाढीसह 147.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ( आयआरईडीए कंपनी अंश )
आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 214.80 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 50 रुपये होती. या कंपनीचा IPO स्टॉक मागील वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये 60 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. या कंपनीने आपल्या शेअर्सची इश्यू किंमत 32 रुपये निश्चित केली होती. ज्या लोकांनी या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांनी पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली होती.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये 130 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक सपोर्ट लेव्हलच्या खाली गेला तर शेअरमध्ये आणखी घसरण पाहायला मिळू शकते. हेडोनोव्हा या पॅरिसस्थित हेज फंड कंपनीच्या CIO च्या मते, आयआरईडीए स्टॉक 155 रुपये या आपल्या महत्त्वाच्या सपोर्ट लेव्हलच्या खाली घसरला आहे.
त्यामुळे पुढील काही दिवसात शेअरमध्ये अस्थिरता पाहायला मिळू शकते. तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकची पुढील सपोर्ट लेव्हल 139 रुपये असेल. जर हा स्टॉक सपोर्ट लेव्हलच्या खाली आला तर शेअरमध्ये आणखी घसरण पाहायला मिळू शकते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.