15 May 2024 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Bonus Shares | फुकट शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, अल्पावधीत पैसा वाढवा

Bonus Shares

Bonus Shares | रामा स्टील ट्यूब्स या लोह आणि पोलाद क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 71 पैशांवरून वाढून 40 रुपये किमतीवर गेले आहे. याकाळात रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 5500 टक्क्यांनी मजबूत झाले आहे. ( रामा स्टील ट्यूब्स कंपनी अंश )

आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. रामा स्टील ट्यूब्स कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 2:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. आज मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी रामा स्टील ट्यूब्स स्टॉक 5.13 टक्के घसरणीसह 38.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रामा स्टील ट्यूब्स कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 19 मार्च 2024 हा दिवस निश्चित केला आहे. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 71 पैशांवर ट्रेड करत होते. तर 11 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 40.93 रुपये किमतीवर पोहोचले होते.

मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 5665 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1345 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 2.83 रुपयेवरून वाढून 40.93 रुपये किमतीवर पोहोचले होते.

मागील 2 वर्षात रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 205 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 26.10 रुपये होती. मार्च 2016 मध्ये, या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 4:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.

जानेवारी 2023 मध्ये देखील कंपनीने गुंतवणुकदारांना 4:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. आता ही कंपनी पुन्हा आपल्या गुंतवणुकदारांना 2:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. ऑगस्ट 2022 मध्ये या कंपनीने आपले स्टॉक स्प्लिट देखील केले होते. तेव्हा रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे 5 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या 5 शेअर्समध्ये विभाजित करण्यात आले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Rama Steel Share Price 12 March 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x