4 May 2024 4:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार?
x

BHEL Share Price | भरवशाचा BHEL शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर, नेमकं कारण काय?

BHEL Share Price

BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या महारत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीची मजबूत ऑर्डर बुक विचारात घेता ब्रोकरेज हाऊसने स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर 299 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश )

सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी BHEL कंपनीचे शेअर्स 259.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी 3.65 टक्के घसरणीसह 245.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांत भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला 36000 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. वार्षिक आधारावर कंपनीच्या ऑर्डर प्रवाहात 102 टक्केची वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीला चौथ्या तिमाहीत 3 मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला 3X800 MW क्षमतेचा NLC तालाबिरा थर्मल पॉवर प्लांट, यमुनानगरमधील DCRTPP येथे 1X800 MW क्षमतेचा अल्ट्रा सुपर क्रिटिकल एक्स्पेन्शन युनिट आणि 2X800 MW क्षमतेच्या NTPC सिंगरौली सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट स्टेज-3 चे काम करण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. या ऑर्डर्सचे एकूण मुल्य 30000 कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 247 टक्के परतावा कमावून दिला आहे.

13 मार्च 2023 रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 74.23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 11 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 259.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 85 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 139.85 रुपयेवरून वाढून 259.05 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 271.90 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 67.63 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| BHEL Share Price today on 12 March 2024

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x