
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते. मात्र आज या स्टॉकमध्ये नफा वसुली मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरमध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपला 4G स्पेक्ट्रमचा काही भाग दोन सर्कलमध्ये सरेंडर केला आहे. आज बुधवार दिनांक 13 मार्च 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 8.03 टक्के घसरणीसह 12.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
मीडिया रिपोर्टनुसार व्होडाफोन आयडिया कंपनीने पश्चिम बंगाल आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये 5 मेगाहर्ट्झ 4G स्पेक्ट्रमचे सरेंडर केले आहे. कंपनीने हे सरेंडर 1800 मेगाहर्ट्झ बँडमधून केले आहे. यामुळे कंपनीचे स्पेक्ट्रमसाठीची देणी कमी होणार आहे. या देणीची पूर्तता करण्यासाठी व्होडाफोन आयडिया कंपनीने भारत सरकारकडून 3 महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे. आणि त्यासाठी कंपनीने सरकारला दायित्व रक्कम देखील जमा केली आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीने केवळ 900 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम बँडवर एक्सटेंशन घेतला आहे.
सध्या व्होडाफोन आयडिया कंपनीने भारत सरकारला आठ कोटी रुपये दिले आहे. या स्पेक्ट्रमची वैधता आता पूर्ण झाली असून व्होडाफोन आयडिया कंपनी त्यावर अधिक बोली लावणार नाही. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 0.36 टक्क्यांच्या घसरणीसह 13.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 66,691.35 कोटी रुपये आहे.
मागील 5 दिवसात व्होडाफोन आयडिया स्टॉक 4.86 टक्क्यांनी घसरला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 5.19 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील 6 महिन्यांत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरची किंमत 30.48 टक्के मजबूत झाली होती. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 108.33 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.