9 May 2024 5:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मिळेल मल्टिबॅगर परतावा

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. नमन इन स्टोअर्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या कंपनीचा IPO 22 मार्च ते 27 मार्च 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. नमन इन स्टोअर कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. ग्रे मार्केटच्या तज्ञांच्या मते, नमन इन स्टोअर्स कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. ( नमन इन स्टोअर्स कंपनी अंश )

नमन इन स्टोअर्स या कंपनीच्या IPO चा आकार 25.35 कोटी रुपये आहे. तज्ञांच्या मते, ग्रे मार्केटमधील प्रीमियम वाढ आणि इश्यू किंमत यांचा विचार करता नमन इन स्टोअर्स कंपनीचे शेअर्स 155 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. या कंपनीच्या IPO शेअर्सची इश्यू किंमत. 84 ते 89 रुपये आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 70 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.

जर हा स्टॉक 89 रुपये या अप्पर प्राइस बँडवर वाटप करण्यात आला तर, शेअर्स 159 रुपये किमतीच्या जवळ सूचीबद्ध होऊ शकतात. या कंपनीचे शेअर्स 2 एप्रिल 2024 रोजी शेअर बाजारात नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जातील.

किरकोळ गुंतवणूकदार नमन इन स्टोअर्स IPO मध्ये 1600 शेअर्सच्या एक लॉटसाठी बोली लावू शकतात. या IPO च्या एका लॉटमध्ये कमाल 1600 शेअर्स असतील. आणि एक लॉट खरेदी करण्यासाठी किरकोळ गुंतवणूकदारांना 142400 रुपये जमा करावे लागतील. नमन इन स्टोअर कंपनीची स्थापना 2010 साली झाली होती. ही कंपनी मुख्यतः रिटेल फर्निचर आणि फिटिंग संबधित व्यवसाय करते. ही कंपनी कार्यालये, ब्युटी सलून, शैक्षणिक संस्थांसाठी मॉड्यूलर फर्निचर बनवण्याचा व्यवसाय करते. या कंपनीचे उत्पादन केंद्र महाराष्ट्रात वसई याठिकाणी स्थित आहे. तसेच महाराष्ट्रात कामण आणि कर्नाटकात बेंगळुरू याठिकाणी कंपनीचे एक-एक गोदाम आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP of Naman In-Store 22 March 2024.

हॅशटॅग्स

IPO GMP(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x