 
						PEL Share Price | पिट्टी इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4400 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. 2014 साली या कंपनीचे शेअर्स 16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( पिट्टी इंजिनिअरिंग कंपनी अंश )
आता या कंपनीचे शेअर्स 750 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहे. शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी पिट्टी इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स टक्के घसरणीसह 1.02 टक्के घसरणीसह 746.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 1083 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 753.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनच्या तुलनेत शेअरची किंमत 1.77 टक्के वाढली होती. व्यवहारादरम्यान हा स्टॉक 765.60 रुपये किमतीवर पोहचला होता.
4 मार्च 2024 रोजी पिट्टी इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 817.75 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पाळतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स 267.90 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 175 टक्क्यांनी वाढले आहेत.
ब्रोकरेज फर्म केआर चोक्सीच्या तज्ञांच्या मते, कंपनीने दक्षिण भारतीय बाजारपेठेत आपली पोहोच वाढवण्यासाठी बागडिया चैत्र इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सोबत करार केला आहे. या कराराचा फायदा म्हणजे, पिट्टी इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीची उत्पादन क्षमता 90,000 टनांवर जाणार आहे.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, आर्थिक वर्ष 2023-26 दरम्यान कंपनीचा महसूल, एबिटा आणि नफा अनुक्रमे 20.4 टक्के, 23.8 टक्के आणि 39 टक्के सीएजीआर दराने वाढू शकतो. पिट्टी इंजिनियरिंग लिमिटेड ही कंपनी मुख्यतः इलेक्ट्रिकल स्टील लॅमिनेशन, मोटर आणि जनरेटर कोरसाठी सब असेंब्ली, डाय कास्ट रोटर्स आणि मशीन केलेल्या कार्ट्स आणि फॅब्रिकेटेड पार्ट्स बनवण्याचा व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		