9 May 2024 9:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?

Adani Green Share Price

Adani Green Share Price | अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 1893.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. ( अदानी ग्रीन एनर्जी कंपनी अंश )

अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने बुधवारी देवीकोट, जैसलमेर, राजस्थान येथे 180 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. आज गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.86 टक्के वाढीसह 1,838.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, कंपनीच्या जैसलमेर स्थित सोलर पॉवर प्लांटमधील वीज खरेदी करण्यासाठी भारतातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा कंपनी असलेल्या सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडसोबत 25 वर्षांचा वीज खरेदी करार संपन्न केला आहे.

जर हा प्लांट यशस्वीपणे कार्यान्वित झाला तर अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे ऑपरेशनल सोलर पॉवर व्हॉल्यूम 6,243 MW पर्यंत वाढेल. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीची एकूण कार्यान्वित नूतनीकरणक्षम वीज निर्मिती क्षमता 9,784 मेगावॅटवर पोहोचली आहे.

अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचा राजस्थानमधील 180 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प वार्षिक 54 कोटी युनिट वीज उत्पादन करणार आहे. या प्लांटमधून 1.1 लाखापेक्षा जास्त घरांना वीज पुरवठा केला जाईल. या प्लांटमुळे 3.9 लाख टन CO2 उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे. जैसलमेरमधील ओसाड प्रदेशात जलसंधारण क्षमता सक्षम करून सोलर पॉवर प्लांटमध्ये ‘रोबोटिक मॉड्यूल’ क्लीनिंग सिस्टम उभारण्यात येणार आहे.

अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1893.90 रुपये किंमत स्पर्श केली होती. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2,016 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 796 रुपये होती. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,95,928.95 कोटी रुपये आहे.

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 85 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2018 मध्ये या कंपनीचे शेअर्स 30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 1800 रुपयेच्या पार गेला आहे. याकाळात कंपनीच्या गुंतवणूकदारांनी तब्बल 6000 टक्के नफा कमावला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Green Share Price NSE Live 28 March 2024.

हॅशटॅग्स

#Adani Green Share Price(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x