19 May 2024 4:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Pricol Share Price | अल्पवधीत 1200% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, पुन्हा मालामाल करणार

Pricol Share Price

Pricol Share Price | प्रिकॉल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 1,200 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 190 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. ( प्रिकॉल लिमिटेड कंपनी अंश )

प्रिकॉल लिमिटेड कंपनीचे भारतात कोईम्बतूर, मानेसर, पंतनगर, पुणे, सातारा आणि श्री सिटी याठिकाणी आणि जकार्ता, इंडोनेशियामध्ये उत्पादन प्रकल्प कार्यरत आहेत. याशिवाय कंपनीने टोकियो, सिंगापूर आणि दुबई येथे 3 आंतरराष्ट्रीय कार्यालय स्थापन केले आहेत. शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी प्रिकॉल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.73 टक्के वाढीसह 406.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

प्रिकॉल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 211.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 90 टक्क्यांनी वाढले आहेत. ब्रोकरेज फर्म मोनार्क नेटवर्थ कॅपिटल फर्मने प्रिकॉल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन 465 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या प्रिकॉल लिमिटेड कंपनी क्लस्टर मेकॅनिकलकडून डिजिटल होण्याकडे वाटचाल करत आहे. सध्या प्रिकॉल लिमिटेड कंपनीला ॲक्ट्युएशन कंट्रोल अँड फ्लुइड मॅनेजमेंट सिस्टीमच्या निर्यातीत मंदीचा सामना करावा लागत आहे.

मोनार्क फर्मच्या मते, “ईव्ही उत्पादनांमधून प्रिकॉल लिमिटेड कंपनीचे महसूल योगदान लक्षणीयरीत्या वाढण्याची अपेक्षा आहे. या कंपनीने आपल्या व्यवसायात प्रगत टेलिमॅटिक्स आणि ई-कॉकपिट सारखे एकात्मिक उपाय डीआयएस विभागात जोडण्याची योजना आखली आहे. शिवाय ही कंपनी इलेक्ट्रिक कूलंट पंप, इलेक्ट्रिक ऑइल पंप, डिस्क ब्रेक आणि बॅटरी व्यवस्थापन प्रणाली देखील बनवण्याचा प्रयत्न करत आहे”.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Pricol Share Price NSE Live 06 April 2024.

हॅशटॅग्स

Pricol Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x